जगाच्या पाठीवर मधुमेहींची संख्या खूप आहे. यात आता तरुणांची आणि बालकांची संख्या देखील वाढते आहे. मधुमेह या आजाराला नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, किडनी या अवयवांवर परिणाम होतात. त्यामुळे दृष्टी जाणं, किडनी निकामी होणं, हृदयाचा झटका, स्ट्रोक या समस्या उद्भवू शकतात.
मधुमेहासाठी योगासने फायद्याची
एखाद्या व्यक्तीला एकदा का मधुमेह झाला की तो बरा होऊ शकत नाही. मात्र त्यावर नियंत्रण करता येणं शक्य आहे. मधुमेहाला नियंत्रणात आणण्यासाठी योगासन खूप फायदेशीर ठरतात. आपल्या भारतातही अनेक इंस्टिट्युटमध्ये मधुमेहावर योगाद्वारे कंस नियंत्रण मिळवता येतं यांंचं प्रशिक्षण दिलं जातं.
मधुमेहासाठी फायदेशीर योगासनं
पश्चिमोत्तानासन
हे आसन केल्यानंतर पाठ, मांडीचे स्नायू आणि नितंब ताणले जातात. शिवाय हे आसन ओटीपोट, खांदे या अवयवांसाठी देखील फायदेशीर आहे.
अर्धमत्स्येंद्रासन
हे आसन पाठीच्या मणक्यासाठी फार उपयुुक्त ठरतं शिवाय यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढण्यास मदत होते.

वजरासन
हे आसन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यासोबतच अन्न पचण्यास कोणताही अडथळा येत नाही. शिवाय यामुळे पाठीचं दुखणंही कमी होण्यास मदत होते.

भस्त्रिका
यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन कफचा त्रास होत नाही. याशिवाय एकाग्रता वाढण्यासाठी हे फायदेशीर आहे.

भ्रामरी
या आसनामुळे ताणतणाव आणि चिडचिडेपणा निघून जाण्यास मदत होते. जर हे आसन नियमितपणे केलं तर हे खूप फायदेशीर आहे.