ज्ञानमुद्रेद्वारे जागृत होऊ शकते तुमची सुप्तशक्ती !
आरोग्यानामा ऑनलाइन टीम – ज्ञानमुद्रा ही योगशास्त्रात खूप महत्वाची मानली जाते. ज्ञानमुद्रेचा शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. नियमित हा योग केल्यास अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकते. अशा या बहुगुणी योगाने व्यक्ती मानसिक आजारांना दूर ठेवू शकते. याचाच अर्थ ही मुद्रा शारीरीक तसेच मानसिक आजारांवर खूपच लाभदायक आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानमुद्रेच्या साहाय्याने सुप्त शक्तीही काही क्षणात जागृत होऊ शकते.हातातील नसाचा संबंध थेट मेंदूशी असतो. डाव्या हाताचा संबंध उजव्या मेंदूशी तर उजव्या हाताचा संबंध डाव्या मेंदूशी असतो. त्यामुळे मानसिक आजारांपासून मुक्ती मिळते. यामुळे सिगारेट, विडी, तंबाखू आणि दारू सारखे व्यसनही सुटू शकते.
अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट एकमेकांना स्पर्श करेल, अशा अवस्थेत ठेवून इतर तीन बोटांना सरळ ठेवावे. सिद्धासन, उभे राहून किंवा झोपेतही जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे या मुद्राचे प्रयोग करावा. ज्ञानमुद्रेमुळे स्मरण शक्तीत वाढ होते. हाताच्या अंगठ्याच्या दोन्ही बाजुंच्या ग्रंथी सक्रिय होतात. ज्ञानमुद्रा एकाग्रता वाढविते. निद्रानाश, हिस्टेरिया, संताप आणि निराशेला ही मुद्रा दूर करते.