नेहमी तरुण दिसायचयं ? मग ‘या’ स्पेशल टिप्स फॉलो करा
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तरूण मुले-मुली सतत आरशात बघत असतात. तारूण्यात ती सवयच असते. हे आरशात बघणे कधी-कधी त्यांना वेगळा आनंद देणारे असते. मात्र, एकदा का वयाची चाळीशी ओलांडली की, आरशात बघितल्यावर काही जणांना सतत टेन्शन येते. कारण चेहऱ्यावरील तारूण्य या वयात उतरणीला लागलेले असते. परंतु, अशा अवस्थेत काय करावे हे लवकर सुचत नाही. या वयातही चेहऱ्यावरील तारूण्याची चमक कायम ठेवण्यासाठी काही टीप्स फॉलो केल्या तर ते शक्य आहे.
चाळीशीत चेहऱ्यावरील नूर हरवतो. या वयात बाजारातील विविध क्रीम अथवा लोशनचा काहीएक उपयोग होत नाही. योगा यावर एक चांगला उपाय आहे. तसेच दररोजच्या राहणीमानात तसेच खानपानात काही बदल केले तर त्वचा नितळ होऊ शकते. अशा वयात सकाळी दहापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत सूर्याच्या उन्हात जाणे टाळावे. चेहरा, मान तसेच हात रुमाल अथवा स्कार्फने झाकावा. हातात सनग्लासेज वापरावे. डोळ्यांचे संरक्षण होण्यासाठी गॉगल वापरावा. चेहरा आठवड्यातून एकदा एक्स-फोलीयेट करून स्वच्छ करून घ्यावा. चेहऱ्यावर वारंवार फाउंडेशन आणि ब्लश करून नये. ब्लशमुळे चेहऱ्यावर सुरुकुत्या येतात.
आणखी टीप्स म्हणजे पिकलेल्या पपईचा गर तळ हातावर मळून चेहऱ्यावर लावावा. वीस मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करून नंतर एरंडीच्या तेलाने चेहऱ्याची हलक्या हाताने मसाज करावी. चेह ऱ्यावरील दाग नाहीसे होतात. चेहऱ्यावरील सुरुकुत्या जातात. दररोज अंघोळ करताना चेहरा थंडगार पाण्याने धुवावा. कोमट पाण्यामुळे चेहरा काळा पडतो. चेहऱ्यावर काळे डाग असतील तर त्वचारोग तज्ज्ञांकडे जावे. कापसाच्या बोळ्यात लिंबाचा रस घेऊन डाग असलेल्या जागेवर दहा मनिटे लावावे, चांगला परिणाम दिसून येतो.