आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रागीट स्वभाव आणि स्मरणशक्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे दोष दूर करण्यासाठी ‘योगासन’ हा सर्वोत्तम मार्ग आहे. यासाठी काही मुद्रा खूप लाभदायक असून त्या नियमित केल्यास चांगला फरक पडतो. या मुद्रा कशा कराव्यात व त्यापासून कोणते लाभ होतात, याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत.
अशी करा ज्ञान मुद्रा
आसन अंथरून शक्यतो पद्मासन किंवा सुखासनात बसावे. ५-१० दीर्घ श्वास घ्यावेत आणि हळूहळू सोडावेत. त्यानंतर शांत चित्ताने बसून पुढील मुद्रा दोन्ही हातांनी कराव्यात. विशेष अत्यावश्यक परिस्थितीमध्ये या मुद्रा केव्हाही करू शकता. या मुद्रेचे नाव ज्ञान मुद्रा असे आहे. तर्जनी अर्थात पहिले बोट वाकवून त्याच्या टोकाला अंगठ्याच्या टोकाचा स्पर्श करावा. बाकीचे तिन्ही बोटे सरळ ठेवावीत.
हे फायदे होतील
अनिद्रा, अतिनिद्रा, कमजोर स्मरणशक्ती, रागीट स्वभाव इत्यादींमध्ये ही मुद्रा अत्यंत लाभदायक आहे. ही मुद्रा केल्याने पूजा-पाठात, ध्यान-भजनात मन लागते. दररोज ३० मिनिटे या मुद्राचा सराव करावा.