आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चांगली बुद्धीमत्ता असेल तर प्रगती वेगाने होते. बुद्धमत्ता वाढविण्याचे बरेच उपाय असले तरी ते करण्यासाठी अनेकांकडे वेळेचा अभाव असतो. मात्र, बुद्धीमत्ता वाढविण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे. याद्वारे तुम्ही बुद्धमत्ता वाढवू शकतो. थोडा वेळ काढून भद्रासन केल्यास बुद्धीमत्ता चांगली होते. भद्रासन कसे करावे याविषयी आपण माहिती घेवूयात.
असे करा भद्रासन
भद्रासन करण्यासाठी प्रथम दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून बसावे. दोन्ही तळवे एकमेकांना जोडावेत. या स्थितीला रेचक अवस्था म्हणतात. रेचक अवस्थेत बसून दोन्ही हात समोर जमिनीवर ठेवावे. हाळूहाळू शरीर वर उचलावे आणि पंजावर अशा पद्धतीने बसावे, की शरीराचे संपूर्ण वजन टाचेवर आले पाहिजे. पायाच्या बोटावर वजन पडू देऊ नये.
हे होतील फायदे
* शरीरात स्फूर्ती निर्माण होते.
* बुद्धी तल्लख होते.
* कल्पनाशक्तीचा विकास होतो.
* पाचनक्रिया वाढून शरीर शुद्ध होते.
* स्नायू बळकट बनतात.
* गॅस, स्वप्नदोष, कंबरदुखी, डोकेदुखी, झोप न लागणे, चक्कर येणे, अपचन, उलटी, उचकी, अतिसार, डोळ्याचे आजार इत्यादी आजार बरे होतात.