आरोग्यनामा ऑनलाइन टीम – योग्य आहार आणि व्यायामाअभावी अॅसिडीटी, बद्धकोष्ठता, वायू, या समस्या खूपच वाढल्या आहेत. या समस्या मुळापासून घालवण्यासाठी योगा हा सर्वोत्तम मार्ग आहे. पोटासंबंधी सर्व आजारांवर उत्तानपाद आसन केल्याने या समस्या कायमच्या बंद होतात. उत्तानपाद आसन कसे करावे आणि त्याचे फायदे कोणते आहेत, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
असे करा उत्तानपाद आसन
हे आसन करण्यासासाठी जमिनीवर कपडा टाकून सरळ रेषेत झोपावे. दोन्ही हात शरिराच्या दोन्ही बाजूला ठेवावे. डोळे उघडे ठेवून श्वास आत घेत पाय वर उचलावेत. पाय वर उचलताना डोके जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी. नंतर श्वास तसाच रोखून काही वेळ याच आवस्थेत रहावे. त्यानंतर हाळूहाळू पाय परत जमिनीवर ठेवावेत. ही क्रिया दररोज पाचवेळा करावी.
या आसनाचे फायदे
पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात.
* या आसनात उदरावर तान पडतो. उदरा हे ७२ हजार सुक्ष्म नाडींचे केंद्र असते. या आसनात उदरावर तान पडल्यामुळे ७२ हजार नाडी एकाच वेळी कार्यशाल होउन त्यात चेतना निर्माण होते.
* मणिपूरक चक्र जागृत होते. भुक वाढते. अॅसिडीटी, आपचन, गॅस, भुक न लागणे, पोट दूखी, बद्धकोष्ठता यासारख्या सर्व तक्रारी नाहीशा होतात. एकाग्रता वाढते. मन शांत होते.
* शारिरिक आणि मानसिक आरोग्य चागंले राहते. प्रत्येकाने हे आसन करावे.