आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जांभई येणे हा आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव असू शकतो. परंतु, वारंवार जांभई येत असल्यास यामागे गंभीर कारण असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध व्हावे. सर्वसाधारणपणे अपूरी झोप, थकवा, कंटाळा आदी कारणांमुळे जांभई येते, असे म्हटले जाते. पण वारंवार जांभई येत असेल तर त्यामागे कोणते धोके असू शकतात ते जाणून घेवूयात.
असू शकते हे कारण
1थायरॉइड
सतत जांभई येणे हायपोथायरॉईड डिस्मचे संकेत आहेत. शरीरात थायरॉइड हार्मोन कमी झाल्याने सतत जांभई येते.
2 ब्रेन ट्यूमर
ब्रेन स्टेजमध्ये जखमा झाल्याने देखील जास्त जांभई येते. तसेच ब्रेनमध्ये पिट्यूटरी ग्लेंड दाबली गेल्यामुळे जास्त जांभई येते.
3 बीपी, हृदयाचे ठोके
तणावामुळे ब्लडप्रेशर वाढते आणि हृदयाचे ठोके संथ गतीने पडतात. यामुळे ऑक्सिजन ब्रेनपर्यंत पोहोचत नाही. अशावेळी जांभईमार्फत शरीरात ऑक्सिजन पोहचतो.
4 ग्लूकोजची पातळी
सतत जांभई येणे डायबेटीजमधील हायपोग्लायसीमियाचे सुरूवातीचे संकेत आहेत.
5 खराब लिव्हर
लिव्हरवर वाईट परिणाम झाला असल्यास शरीर फार लवकर थकते. परिणामी जांभई देखील येते. सतत जांभई येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लिव्हर चेक करून घ्या.
6 हृदयरोग
हृदयाशी संबंधित आजार आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांमुळेही सतत जांभई येते.