आरोग्यनामा ऑनलाईन-प्रश्नः गरोदरपणा नंतर माझ्या चेहर्यावर सुरकुत्या(wrinkles) दिसू लागल्या आहेत. माझे केस गळणे ही सुरू झाले आहेत. घरगुती उपाय करूनही समस्या दूर होत नाही नाही?
उत्तरः गरोदरपणात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यातील प्रोजेस्टन हा एक हार्मोन्स आहे. जो गरोदरपणात तयार होतो. यामुळे, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. याशिवाय ताणतणाव आणि लोहाची कमतरता ही प्रमुख कारण आहे. यासाठी भरपूर लोहयुक्त आहार घ्या. फळे, हिरव्या पालेभाज्या आणि नाचणी भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे. आपले वाढलेले वजन कमी केले पाहिजे. या सुरकुत्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे वाढतात. अल्ट्राव्हायोलेट किरणे घरगुती गॅसची ज्योत, संगणक, मोबाइल स्क्रीन(wrinkles) आणि सीएफएलमध्ये देखील दिसून येते. केस गळती टाळण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार घेतला पाहिजे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.