• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

खासगी डॉक्टरांनी ‘टीबी’ रूग्णांची माहिती न दिल्यास कारवाई

by Nagesh Suryawanshi
March 24, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
खासगी डॉक्टरांनी ‘टीबी’ रूग्णांची माहिती न दिल्यास कारवाई
0
VIEWS

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने टीबीमुक्त भारत करण्यासाठी खासगी डॉक्टरांना त्यांच्याकडील ‘टीबी’ रूग्णांची नोंद सरकारकडे करणं बंधनकारक केलं होतं. याबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तशी अधिसूचनाही काढली होती. जे खासगी डॉक्टर ‘टीबी’ रूग्णांची माहिती देणार नाहीत त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार असल्याचं या अधिसूचनेत म्हटलं होतं. भारतात २०१७ आणि २०१८ या काळात खासगी डॉक्टरांकडून होणाऱ्या टीबीच्या नोंदीत वाढ झाली.

सुधारित राष्ट्रीय टीबी नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, देशभरात खासगी डॉक्टरांकडून झालेली टीबी रूग्णांची नोंद ही २०१८ साली ५.४० लाख होती, जी संख्या २०१७ मध्ये ३.९८ लाख इतकी होती. महाराष्ट्राची ही संख्या पाहिली तर २०१७ मध्ये खासगी डॉक्टरांकडून ६९ हजार १४३ टीबी रूग्णांची नोंद झाली होती. तर २०१८ मध्ये ६८ हजार ५३९ रूग्णांची नोंद केली आहे.

टीबीचं समुळ उच्चाटन करायचं असेल तर खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या टीबी रूग्णांची माहिती सरकारला देणं गरजेचं आहे. लोकांना टीबीच्या आजाराची लक्षणं आढळली की ते पहिल्यांदा खासगी डॉक्टरांकडे धाव घेतात. याशिवाय खासगी डॉक्टरांकडे टीबीचे उपचार घेणं खर्चिकच नाही तर योग्य निदान आणि औषधोपचार होतील का याची देखील शक्यता कमी आहे. खासगी डॉक्टरांना टीबीच्या रूग्णांची माहिती देणं बंधनकारक केल्यानंतरही अनेक डॉक्टर याबाबत माहिती देत नाहीत. यासंदर्भात डॉक्टरांचं समुपदेशनही करण्यात आलं आहे. जे खासगी डॉक्टर टीबी रूग्णांची माहिती देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. याशिवाय खासगी डॉक्टरांनी टीबीच्या रूग्णांची नोंद करावी यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.

Tags: arogyanamaCentral governmenthealthpuneTBआरोग्यआरोग्यनामाकारवाईकेंद्र सरकारटीबीपुणे
butter
सौंदर्य

जाणून घ्या – सौंदर्यवर्धक ‘शिया बटर’ कसे बनवले जाते

July 27, 2019
good breakfast
Food

ब्रेकफास्टसाठी काय चांगले..रस कि सूप..जाणून घ्या

October 12, 2020
सावधान ! आईस्क्रीम मध्ये वापरले जाते वनस्पती तेल
ताज्या घडामाेडी

सावधान ! आईस्क्रीम मध्ये वापरले जाते वनस्पती तेल

April 20, 2019
‘स्वाइन फ्लू’चा धोका टाळण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या
माझं आराेग्य

‘स्वाइन फ्लू’चा धोका टाळण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

July 24, 2019

Most Popular

stomach

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

7 hours ago
pregnancy test

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

7 hours ago
Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.