आरोग्यनामा ऑनलाइन – जीन एडिटींग करुन पहिल्या पालीला जन्म देण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. काही वर्षांपासून संशोधक हे उंदीर, डुक्कर, बकरी, कोंबडी आणि फुलपाखरांच्या जीन्समध्ये बदल करण्याचा प्रयोग करत आहेत. परंतु, जीन एडिटींगची महत्त्वपूर्ण पद्धत सीआरआयएसपीआरने अशक्य वाटणारं एक जेनेटिक परिवर्तन करण्यात संशोधकांना यश आले आहे.
वैज्ञानिकांनी प्रथमच सरपटणारा प्राणी रेप्टाइलवर हा प्रयोग केला आहे. पारदर्शी दिसणारी एनोलिस लिजार्ड म्हणजेच पालीच्या जन्माने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. ही पाल जीनमध्ये बदल करुन जन्माला आली आहे. सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. वैज्ञानिकांकडे आता जेनेटिक रिसर्चचा उपयोग करण्यासाठी एक नवीन मॉडल आलं आहे. मनुष्य बायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी याप्रकारच्या मॉडलचा उपयोग केला जाऊ शकतो. रेप्टाइल्स सर्वच १० हजार प्रजाती अशा रिसर्चपासून दूर होत्या. वैज्ञानिकांना हे संशोधन करणे कठीण वाटत होते परंतु, त्यामध्ये यश आलं आहे.