आरोग्यनामा ऑनलाईन- किडनी शरीरातून विषारी पदार्थ काढण्याचे काम करते. किडनीWorld Kidney Day विषारी घटक ब्लॅडरमध्ये पाठवते जेथे युरिनद्वारे ते शरीराच्या बाहेर काढले जातात. जेव्हा किडनी फेल World Kidney Day होते तेव्हा विषारी घटकांना योग्य प्रकारे रक्तातून फिल्टर करू शकत नाही आणि शरीर विषारी पदार्थांनी भरते. यामुळे किडनी World Kidney Day होऊ शकते आणि गंभीर स्थितीत यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतो.
किडनी फेल होण्याची लक्षणे –
युरिन कमी होणे, पाय किंवा टाचांमध्ये सूज, श्वास घेण्यास अडचण, खुप जास्त थकवा, मळमळणे, गोंधळाची स्थिती, छातीत वेदना किंवा झटका येणे. कधी-कधी लक्षणे नसतानाही किडनी फेल होऊ शकते.
किडनी फेल होण्याची कारणे –
आजारपणामुळे युरिन कमी होणे, हार्ट अटॅक, हृदयरोग, लिव्हर फेल होणे, प्रदूषण, काही औषधे, क्रोनिक डिसीज, डिहायड्रेशन, किडनी ट्रॉमा, अॅलर्जी रिअॅक्शन, गंभीर इन्फेक्शन आणि हाय ब्लड प्रेशर.
आजारामुळे किडनी फेल –
किडनी स्टोन, प्रोस्टेट वाढणे, युरीनरी ट्रॅक्टमध्ये ब्लड क्लॉट्स, ब्लॅडरला कंट्रोल करणार्या नसा कमजोर होणे, किडनीच्या जवळपास ब्लड क्लॉट, बॉडीमध्ये गरजेपेक्षा जास्त विषारी घटक असणे, अनियंत्रित डायबिटीज, ड्रग्ज आणि दारूमुळे किडनी फेल होते.
किडनी फेल होण्याच्या स्टेज –
किडनी फेल होण्याचे 5 टप्पे असतात. पहिली स्टेप खुप हलकी असते आणि खास लक्षणे जाणवत नाहीत. या स्टेजवर हेल्दी लाइफस्टाइल, संतुलित डाएट, नियमित एक्सरसाइज आणि वजन कंट्रोल करून किडनी ठीक होऊ शकते. डायबिटीज असेल तर ब्लड शुगर नियंत्रित ठेवा.
दुसर्या टप्प्यात सुद्धा हलकी लक्षणे असतात. परंतु युरिनमध्ये प्रोटीन किंवा एखाद्या प्रकारचे फिजिकल डॅमेज स्पष्टपणे समजू लागतो. या स्टेजमध्ये सुद्धा हेल्दी लाइफस्टाइल उपयोगी येऊ शकते. निष्काळजीपणा केल्या या स्टेजमध्ये हृदयरोग, इम्फ्लेमेशन किंवा ब्लड डिसऑर्डर सुद्धा होऊ शकते.
तिसर्या टप्प्यात मध्यम लक्षणे दिसू लागतात. किडनी व्यवस्थित काम करत नाही. ब्लड टेस्टद्वारे हे समजू शकते. या स्टेजमध्ये हाता-पायांना सूज, पाठीत वेदना आणि युरिनचा रंग बदलेला स्पष्ट दिसतो. लाइफस्टाइलमध्ये बदल करून डॉक्टरांशी संपर्क करा.
चौथ्या टप्प्यात किडनीचा आजार थोडा जास्त होतो. या स्टेजमध्ये किडनी पूर्णपणे फेल होत नाही परंतु चांगल्याप्रकारे काम करणे बंद करते. या स्थितीत अॅनीमिया, हाय ब्लड प्रेशर आणि हाडांचे रोग यासारख्या समस्या होऊ लागतात. या स्टेजमध्ये डॉक्टरांशी संपर्क करून औषधे सुरू केली पाहिजेत.
पाचव्या टप्प्यात किडनी पूर्णपणे फेल होते. किडनी फंक्शन बंद झाल्याने नुकसान आणि जास्त दिसू लागते. यामध्ये उलटी आणि मळमळणे, श्वास घेण्यास त्रास, त्वचेला खाज आणि अनेक लक्षणे दिसू लागतात. या स्थितीमध्ये नियमित डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता भासते.
कसा करा बचाव –
हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीजपासून बचाव, हेल्दी लाइफस्टाइल आणि डॉक्टरने सांगितलेली औषधे नियमित घेऊन किडनी फेलच्या स्थितीत बचाव करू शकता.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.