• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

‘थकवा’ हा देखील एक आजारच : WHO

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 30, 2019
in ताज्या घडामाेडी
0
Burn-Out-image

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – थकवा येणे हा एक प्रकारचा आजार आहे हे आता ‘जागतिक आरोग्य संघटने’ नेही मान्य केले आहे. मानसिक, भावनिक आणि शारीरिक अशी थकव्याची वर्गवारी करता येईल. कामात बराच काळ तणाव असल्यास थकवा जाणवतो. यामुळे भावनिक थकवा येतो. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कामाच्या ठिकाणावरचा स्ट्रेस व्यवस्थित मॅनेज झाला नाही तर हा थकवा येतो. त्यास ‘बर्न आऊट’ म्हटले जाते.

काम कोणतेही असले तरी कामाच्या ठिकाणी कमीअधिक प्रमाणात तणाव जाणवतोच. नेहमीचेच असल्याने कर्मचाऱ्यांनाही या तणावाची सवय होऊन गेलेली असते. परंतु, खराब व्यवस्थापनामुळे हा तणाव खुपच वाढतो. तो एवढा वाढतो की एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. अशी स्थिती कायम राहिल्यास एखाद्या व्यक्तीस अन्य मानसिक आजारही होऊ शकतात. अशा प्रकारचा टोकाचा तणाव टाळायचा असेल नोकरीच्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आरोग्यपूर्ण वातावरण राहील.

क्षमतेपेक्षा जास्त काम करण्यास सांगणे, मर्यादित नियंत्रण, कामाचे कौतुक न करणे, एखाद्याला जाणीवपूर्वक अयोग्य काम देणे, नीतिमत्तेला अनुसरून नसलेले काम करावे लागणे आणि कामाच्या ठिकाणी एकजूट नसणे या ६ गोष्टी कामाच्या ठिकाणी धोकायदायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या सहा गोष्टींमुळे हा बर्न आऊट होतो. बर्न आउट किंवा थकवा ओळखण्याची काही लक्षणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने एनर्जी कमी होते, कामापासून दूर जावेसे वाटते, स्वत:च्या कामाबद्दल नकारात्मक भावना येतात. तुमची कार्यक्षमता कमी होते. अशी लक्षणे आपल्या सहकाऱ्यांमध्ये दिसत असतील, तर त्यांना यामधून बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे. शिवाय ऑफिसने अशा व्यक्तींना सिक लीव्ह दिली पाहिजे. अशा व्यक्तीने मानसोपचार तज्ज्ञांकडे जावून उपचार घ्यावेत.

Tags: AarogyanamaBurn OutDepressiontirednessWork Placeआरोग्यनामाकामाचे ठिकाणडिप्रेशनथकवाबर्न आऊट
Beetroot Benefits | beetroot nutrition and health benefits how does beetroot juice help the body
Food

Beetroot Benefits | ‘या’ कारणांमुळे बीट अत्यंत पौष्टिक मानले जाते, महिनाभर सेवन केल्यास आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
June 28, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - बीटरूट आरोग्यासाठी (Beetroot For Health) सर्वात पौष्टिक असे कंदमुळ आहे. गडद लाल रंगाची ही भाजी अनेक...

Read more
Alcohol Side Effects | alcohol side effects on body how it affects brain and nervous system

Alcohol Side Effects | ‘या’ सवयीमुळे मज्जासंस्था, मेंदू आणि अवयवांचे गंभीर नुकसान होऊ शकते; जाणून घ्या

June 28, 2022
Yoga For Growing Children | yoga and health yoga for growing children yoga asanas for children s health benefits

Yoga For Growing Children | योगासनांमुळे मुलांच्या निरोगी विकासास मदत होईल, त्याच्या सरावाची सवय नक्की लावा

June 28, 2022
Yoga Asanas For Blocked Nose | yoga and health these 3 yoga asanas for blocked nose know daily yoga tips

Yoga Asanas For Blocked Nose | बंद नाकाच्या समस्येने त्रस्त असाल तर या तीन आसनांच्या सरावाने सर्दीपासून मिळेल आराम; जाणून घ्या

June 28, 2022
High Blood Sugar | diabetes high blood sugar warning signs symptoms of blood sugar is too high fatigue weight loss

High Blood Sugar | ‘ही’ 5 लक्षणे दिसताच समजून जा की खुप वाढली आहे ब्लड शुगर, ताबडतोब लक्ष द्या

June 23, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021