आरोग्यनामा ऑनलाइन – सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये लंग म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर सर्वात सामान्य आहे. याचे विशेष कारण स्मोकिंग मानले जाते. यापासून फुफ्फुसांना वाचवण्याकरता सिगारेट न ओढण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, ही धारण पूर्णपणे चुकीची आहे की, स्मोक न केल्यास फुफ्फुसांचा कॅन्सर होणार नाही. उलट अशा लोकांची संख्या वाढत आहे जे स्मोकिंग करत नसतानाही लंग कॅन्सरला बळी पडत आहेत. यात महिलांची संख्या जास्त आहे. स्मोकिंग आणि नॉन स्मोकिंग लंग कॅन्सरमध्ये फरक आहे. हा फरक कॅन्सरच्या पेशींमधील जीनमध्ये असतो. नॉन स्मोकर्समध्ये सामान्यपणे कॅन्सर ईजीएफआर जीनमधील बदलामुळे होतो.
नॉन स्मोकर्समध्ये लंग कॅन्सरची कारणे
1 पॅसिव्ह स्मोकिंग
यात व्यक्ती थेट स्मोक करत नाही. दुसर्या व्यक्तीच्या सिगारेटमधून निघणार्या धुराला बळी पडते. अशा लोकांना 24 टक्के धोका वाढतो.
2 अस्बेस्टॉस
अस्बेस्टॉस एक असा घटक आहे जो सीमेंटचे पत्रे, थर्मल आणि ध्वनी संबंधी वस्तू बनवण्यासाठी वापरला जातो. याचे सुक्ष्म कण श्वासाद्वारे फुफ्फुसांत जातात. हे काम करणार्या लोकांना जास्त धोका असतो.
3 नॉन स्मोकर्स महिलांना धोका
घरात कोळश्यावर जेवण बनवताना काही केमिकल्स तयार होतात जे फुफ्फुसांचे नुकसान करतात. यामुळे महिलांना लंग कॅन्सरचा धोका वाढतो.
4 वायु प्रदूषण
वाहने, इंडस्ट्रीज, पावर प्लँटमधून होणार्या प्रदुषणाने लंग कॅन्सरचा धोका वाढतो. हे सर्वात मोठे कारण आहे.
5 रेडॉन गॅस
युरेनियममुळे रेडॉन गॅस निघतो. या गॅसमुळे लंग कँसरचा धोका जास्त असतो. घर बांधकाम, घराचे पाईप आणि नळ्यांमध्ये युरेनियमचा वापर होतो. यातून हळुहळु गॅस निघत राहतो. यासाठी घराचे व्हँटिलेशन चांगले असावे.
नॉन स्मोकरमधील लंग कॅन्सरची लक्षणे
1 काही लोकांची प्रकृती नेहमी बिघडलेली राहते.
2 सतत थकवा जाणवतो.
3 खोकल्याची समस्या असते.
4 श्वास घेण्यास त्रास होतो.
5 छातीत दुखते.
6 घसा बसणे, रक्त गोठणे.
नॉन स्मोकर्समध्ये कॅन्सरची लक्षणे उशीरा दिसून येतात.