जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’
दरम्यान लुणिया हे गेल्या ३४ वर्षांपासून रक्तदान करत आहेत. त्यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयात स्वखर्चाने जाऊन ११ वेळा रक्तदान तर नाशिकला जाऊन १५ वेळा रक्तदान केलं आहे.रक्ताचा काय कुठे कारखाना नाही. ते फक्त माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकत. अपघात झाल्यांनतर त्या रुग्णाला तात्काळ रक्ताची गरज असते. अशावेळी रक्त वेळेवर मिळाले नाही. तर तो रुग्ण दगावन्याची फार शक्यता असते. किंवा शस्रक्रिया, बाळंतपण यात जास्त रक्त गेल्याने रक्ताची आवश्यकता भासते. म्हणून लुणिया हे रक्तदान स्वतः तर रक्तदान करतातच पण ते रक्तदानाची शिबिरे आयोजित करून ते अनेकांकडून रक्तदान करून घेतात. रक्तदान केल्याने शरीराला काहीच हानी पोहचत नाही.आणि ४८ तासात तर पुन्हा नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्तदान करायला पाहिजे.असं लुणिया सांगतात आणि लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करतात.
या बरोबरच अनिल लुणिया हे देहदान,अवयवदान याची शिबिरे आयोजित करतात.औरंगाबादच्या घाटी रुणालयातील ज्या रुग्णांना अवयवांची गरज आहे. त्यांना देतात. किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांना प्रयोगासाठी बॉडी देतात. त्यांनी आतापर्यंत ५२६ डोळेदान आणि ९९ देहदान करून घेतले आहेत. लुणिया यांचे गरजू लोक,विद्यार्थी यांच्यासाठीचे कार्य खूप महान आहे. ते गरीब, अनाथ मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करतात.
तसेच प्रत्येक रक्षाबंधनला घाटी रुग्णालयातील महिला रुग्णांकडून राख्या बांधून घेतात. आणि राख्या सोबत त्यांना साड्या,बेडशीट भेट देतात. यावेळी रुग्णालयातील मुस्लिम महिलाही त्यांना राखी बांधत असल्याचे लुणिया सांगतात. एवढेच नाही तर आतापर्यंत त्यांनी १६ नागरिकांचे स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आहेत. तसेच औरंगाबादमधील मदर तेरेसा आश्रमातील १२२ मुलांना ते औषधी पुरवतात. एवढेच नाही तर घाटी रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी ते प्रत्येक रविवारी अन्नदान करतात. या थोर व्यक्तीसारख्या समाजसेवकांची सध्या समाजात खूप गरज आहे. कारण आजही अनेक लोक असे आहेत कि त्यांना एकवेळचे जेवणही मिळणे मुश्किल आहे. या लोकांसाठी अनिल लुणिया यांच्या सारख्या महान व्यक्तीची गरज आहे.