• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

World Aids Day 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 7 लक्षणे तर असू शकतो एड्सचा संकेत, असा करा बचाव

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
December 1, 2021
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
World Aids Day 2021 | world aids day 2021 7 symptoms of hiv positive know more about prevention

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – World Aids Day 2021 | एड्स एक असाध्य आजार आहे. या आजाराच्या बचावासाठी जागरूकता एकमेव उपाय आहे. यासाठी एड्सची लक्षणे (Aids Symptoms), कारणे आणि बचावची पद्धत माहित असणे आवश्यक आहे. डॉक्टर्स म्हणतात की, एचआयव्ही संक्रमित व्यक्तीने जर हेल्दी लाईफस्टाईल आणि डाएट फॉलो केले त्याचे जीवन सामान्य होऊ शकते. एड्सच्या बाबतीत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबरला ’वर्ल्ड एड्स डे’ साजरा (World Aids Day 2021) केला जातो.

 

एड्सचा प्रसार कसा होतो?
एचआयव्ही पॉझिटिव्ह (hiv positive) असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे (physical relation) होतो. रुग्णाच्या शरीरात वापरलेले इंजेक्शन दुसर्‍या व्यक्तीला दिल्यानेही हा आजार होऊ शकतो. एचआयव्ही विषाणू पीडित व्यक्तीचे रक्त दुसर्‍या व्यक्तीला दिल्याने पसरतो. एचआयव्ही बाधित गर्भवती महिलेच्या शरीरातून जन्मलेल्या बाळाच्या शरीरातही हा विषाणू पसरू शकतो. (World Aids Day 2021)

 

एड्सची लक्षणे
एड्सच्या सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. एखादी व्यक्ती सामान्य काळाप्रमाणे निरोगी राहते. त्याची लक्षणे काही वर्षांनी दिसून येतात. ताप, थकवा, कोरडा खोकला, वजन कमी होणे, त्वचेवर, तोंडाभोवती, डोळे किंवा नाकावर डाग, कालांतराने कमकुवत स्मरणशक्ती आणि शरीर दुखणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.

घसा खवखवणे किंवा सुजलेल्या ग्रंथीकडे दुर्लक्ष करण्याने अडचणीत येऊ शकता. त्वचेवर पुरळ आणि स्नायू दुखणे ही एचआयव्ही संसर्गाची लक्षणे असू शकतात. घसा, तोंड किंवा गुप्तांगात फोड येणे हे एचआयव्ही संसर्गाचे लक्षण आहे. एड्सच्या रुग्णांना रात्री घाम येण्याची समस्या असू शकते, असे डॉक्टर सांगतात. पोट खराब होणे किंवा जुलाब यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करणेही चुकीचे आहे.

 

या गोष्टींमुळे एड्सविरुद्ध लढण्याची मिळेल शक्ती

1. फळे आणि भाज्या (Fruits and vegetables) –
फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे पोषण, ज्याला अँटी-ऑक्सिडंट म्हणतात, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. विविध प्रकारची फळे आणि भाज्या खा, जेणेकरून शरीराला विविध प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील.

 

2. लीन प्रोटीन (Lean protein) –
शरीराला मजबूत स्नायू आणि चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी लीन प्रोटीन देखील आवश्यक आहेत. यासाठी ताजे चिकन, मासे, अंडी, शेंगा आणि बदाम यांचा आहारात समावेश करा.

 

3. धान्य (Grain) –
तुमच्या शरीराला कर्बोदकांपासून ऊर्जा मिळते. यासाठी ब्राऊन राइस किंवा गव्हाची चपाती खावी. संपूर्ण धान्यामध्ये व्हिटॅमिन-बी व्यतिरिक्त, फायबर देखील आहे, जे शरीरात चरबी जमा होण्याच्या समस्येला प्रतिबंधित करते (लायपोडिस्ट्रॉफी). एचआयव्हीमध्ये त्याचे मोठे दुष्परिणाम होऊ शकतात.

 

4. हेल्दी फॅट (Healthy Fat) –
फॅटमुळे शरीराला ऊर्जा मिळते, पण त्यात भरपूर कॅलरीज असतात. आहारात फक्त हेल्दी फॅट्सचा समावेश करा. बदाम, वनस्पती तेल आणि एवोकॅडोमध्ये असलेले हेल्दी फॅट तुमच्यासाठी योग्य असेल.

5. पुरेशा प्रमाणात कॅलरीज (Enough calories) –
वजन असामान्यपणे कमी होत असल्यास, डॉक्टर पौष्टिक पूरक आहार सुचवू शकतात.
परंतु काही वेळा वजन वाढल्याने हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.
म्हणून, फक्त हेल्दी खा आणि कॅलरीज पुरेशा प्रमाणात घ्या.

 

6. भरपूर पाणी प्या (Drink lot of water) –
आजारपणामुळे लोकांना अनेकदा तहान लागत नाही.
पण एचआयव्हीसारख्या घातक आजारात शरीराला दररोज 8-10 कप पाणी किंवा इतर कोणतेही द्रवपदार्थ आवश्यक असते.

 

7. साखर आणि मीठ (Sugar and salt) –
हृदयाशी संबंधित आजारांचा धोका एचआयव्हीमध्येही लक्षणीय वाढतो.
जास्त साखर किंवा मीठ आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
दैनंदिन आहारात साखरेचे प्रमाण किती आहे याची काळजी घ्यावी.
याशिवाय, तुम्ही दररोज 2300 मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

 

Web Title :- World Aids Day 2021 | world aids day 2021 7 symptoms of hiv positive know more about prevention

हे देखील वाचा 

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Benefits Of Using Ice Cubes | चेहर्‍यावर बर्फ वापरण्याचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, माहित नाहीत तर जाणून घ्या!

Immunity | Omicron व्हेरिएंटच्या धोक्यापूर्वी मजबूत करा इम्यूनिटी, ‘या’ 8 गोष्टींचा आहारात करा समावेश; जाणून घ्या

Tags: Aids DayAids SymptomsBoiled Egg Lean ProteinDoctorsDrink lot of waterFruits and vegetablesGrainHealthy Fathealthy lifestyleHIVHIV positiveHIV VirusLean proteinphysical relationPregnant womenSugar and saltWorld AIDS DayWorld Aids Day 2021आजारएचआयव्हीएचआयव्ही पॉझिटिव्हएचआयव्ही विषाणूएड्सएड्स लक्षणेएड्सची लक्षणेगर्भवती महिलाडॉक्टर्सधान्यपुरेशा प्रमाणात कॅलरीजफळे आणि भाज्याभरपूर पाणी प्यालीन प्रोटीनलैंगिक संबंधवर्ल्ड एड्स डेसाखर आणि मीठहेल्दी फॅटहेल्दी लाईफस्टाईल
Health Care Tips | vegetables not to eat in diabetes
ताज्या घडामाेडी

Health Care Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही खाऊ नयेत या 4 भाज्या, होऊ शकते आरोग्याचे नुकसान

by Nagesh Suryawanshi
August 6, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Care Tips | भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स...

Read more
Viral Fever | symptoms precaution and diet in viral fever

Viral Fever | पावसाळ्यात आजारांपासून वाचण्सासाठी आहारात करा या वस्तुंचा समावेश, रहाल तंदुरुस्त

August 6, 2022
Protein Rich Flours | protein rich flour replacement for wheat atta gram chickpea soya sattu roasted bengal gram

Protein Rich Flours | गव्हाच्या पीठाऐवजी आहारात समावेश करा या 3 हेल्दी ऑपशनचा, शरीरात होणार नाही प्रोटीनची कमतरता

August 6, 2022
Benefits Of Black Jamun | jamun is effective from hemoglobin to blood pressure know its benefits in marathi

Benefits Of Black Jamun | हिमोग्लोबिनच्या कमतरतेपासून ब्लड प्रेशरपर्यंत इफेक्टिव्ह आहे जांभूळ, जाणून घ्या अनेक फायदे

August 5, 2022
Muesli Health Benefits | health why muesli good for weight loss in marathi

Muesli Health Benefits | मूसळी वजन कमी करण्यासाठी उपयोगी, अनेक आजारांत देते आराम

August 5, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021