महिलांची हिमोग्लोबिन व थायराइड तपासणी
आरोग्यनामा ऑनलाईन – करमाळा येथील लोकमंगल नारी मंच व लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने महिलांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यानिमित्ताने महिलांची मोफत हिमोग्लोबिन व थायराइडची तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य शिबीरात २२ महिलांची तपासणी झाली.
याकामी करमाळा एस. डी. एच. के. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डुकरे व डॉ. प्रितम यांनी सहकार्य केले. वीरपत्नी संगिता कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अफरीन बागवान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुनिता देवी, वर्षा करंजकर, डॉ. सुजाता मेहता, आसादे एलीझाबेथ, शीतल करे-पाटील, संगीता गायकवाड, ज्योती पांढरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अंजली श्रीवास्तव यांनी केले. दीपा मंडलेचा, पुष्पा लुंकड, ज्योती पांढरे यांनी सूत्रसंचलन केले. जयश्री वीर व शगुफ्ता शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. वीणा देवी, शैलजा राहिगुडे, मितवा श्रीवास्तव, नगमा मोमिन, शमा बोधे यांनी सहकार्य केले.