आरोग्यानामा ऑनलाइन टीम : स्तनपानाचे महत्व सर्वच महिला जाणतात. परंतु, काही चुकीच्या सल्ल्यांमुळे महिला बाळाचे स्तनपान लवकर बंद करतात. परंतु, किमान सहा महिने तरी स्तनपान करणे हे बाळासह मातेच्याही फायद्याचे असते. फिगर बिघडेल या भितीपोटी अनेक महिला बाळाला स्तनपान देत नाहीत. यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतोच, शिवाय बाळाला किशोर अवस्थेतच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज होण्याचा धोका असतो, असे संशोधक सांगतात.
हे लक्षात ठेवा
* बाळांना सहा महिन्यापेक्षाही कमी स्तनपान केल्याने बाळाला भविष्यात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज होतो.
* या आजारात यकृतातील पेशींमध्ये चरबीचे प्रमाण वाढते. यकृत जराही अल्कोहोल पचवू शकत नाही. स्थूलपणा वाढतो. इन्शुलिन निर्मितीवर परिणाम होतो.
* सहा महिन्याच्या आत मुलांना बाहेरचे दूध आणि पावडरचे दूध न देता मातांनी मुलांना स्तनपानच करावे.
* ज्या स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या सुरूवातीलाच स्थूलता (ओबेसिटी) असते त्यांच्या मुलांमध्ये किशोरवयात लिव्हरचे आजार होण्याची शक्यता दुप्पट असते.
* ज्या स्त्रियांचं गरोदरपणाआधी योग्य आणि प्रमाणशीर वजन असते आणि ज्या स्त्रिया सहा महिने आणि त्यापेक्षा अधिक काळापर्यंत बाळाला व्यवस्थित स्तनपान करतात त्यांच्या मुलांचे यकृत भविष्यातही सुदृढ राहाते.
* ज्या स्त्रिया गरोदरपणातही धूम्रपान करतात त्यांच्या मुलांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज होण्याचा धोका जास्त असतो.
Visit : arogyanama.com