जालना : आरोग्य नामा ऑनलाईन – महिलांनी आपले आरोग्य जपण्यासाठी स्वत:चा आहार संतुलित ठेवावा, शरिराला व्यायामाची सवय लावावी, असे आवाहन डॉ. सोनाली जेथलिया यांनी केले. जालना, संभाजीनगरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, प्रा. वर्षा देशमाने, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, अंबादास घायाळ यांच्यासह माता पालकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ. जेथलिया यांनी महिलांनी स्वत:चे आरोग्य आणि आहार कसा संतुलित ठेवावा. याबद्दल मार्गदर्शन करुन काही टीप्सही दिल्या. पोलिस उपनिरीक्षक जाधव यांनी महिलांनी आर्थिक परिस्थितीवर मात करून जीवनातील ध्येय कसे साध्य करावे याबद्दल सविस्तर सांगून महिलांच्या अधिकाराविषयक कलमांची माहिती दिली. प्रा. देशमाने यांनी समाजातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्त्रीचे फार महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षक सूर्यकांत बेले, अशोक माधवले, मोहन भदाडे, पांडुरंग वाजे, शिवहरी मांटे, सुनीता खरात, अमोल पवार, गजानन दळवी, अर्चना भालेराव, शिवराम गिराम, सुनील जाधव, पुरुषोत्तम चौरे, कीर्ती खैरे, अनिता जाधव, रमेश गाढवे, कांचन वाघ, राजेश कुलकर्णी, संदीप वाखारकर, अरुणा मांटे, संजय खरात, वसंतराव गाडेकर यांच्यासह विद्यार्थी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती पल्लवी खरात यांनी तर प्रमिला जाधव यांनी आभार मानले.