गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणात करू नयेत ‘या’ ५ गोष्टी
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गरोदर महिलेने ग्रहण न पाळल्यास त्याचा विपरित परिणाम हा गर्भातील बाळावर होत असतो. आणि हाच परिणाम टाळण्यासाठी अनेक गरोदर महिला कटाक्षाने हा ग्रहण पाळतात. या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नये याची यादी अनेकदा ज्येष्ठ मंडळींकडून सांगितली जाते. आणि ती गोष्ट गरोदर महिला आवर्जून पाळतात. त्यामुळे खालील दिल्याप्रमाणे ग्रहणाच्या दिवशी या गोष्टी करू नयेत.
आज १७ जुलै रात्री १२. १३ ला चंद्रग्रहण सुरु होणार आहे. हे चंद्रग्रहण आशिया, आफ्रीका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या काही भागातही चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण ५ तास ३४ मी. राहणार आहे.
१) ग्रहणाच्या वेळी म्हणजे ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत काहीही खाऊ नये.
२) यावेळेत साधं पाणी प्राशन न करता फक्त नारळ पाण्याचे सेवन करावे.
३) रात्री दूध-भात खाल्यास उत्तम समजला जातो.
४) त्याचप्रमाणे यावेळी गर्भवती महिलेने गाठ मारू नये.
५) गरोदर महिलेने कोणतीही वस्तू किंवा भाजी यावेळी कापू नये.