आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाळांतपण म्हणजे आईचा दुसरा जन्म असतो असे म्हटले जाते. कारण, या काळात तिला एका मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. परंतु, आई होण्याच्या आनंदापुढे हे आव्हान माता सहज स्वीकारते. परंतु, या वेदना सहन केल्यानंतर आणि बाळ जन्माला आल्यानंतरही आईला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बाळंतपणानंतर काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मातृत्वाच्या आनंदांवर विरजण पडू शकते.
वेळीच करा उपाय
काळी वर्तुळे
बाळामुळे रात्रभर जागरण करावे लागत असल्याने तसेच थकव्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात.
स्ट्रेचमार्क
बाळंतपणानंतर पोटावर स्ट्रेचमार्क येतात. याकडे दुर्लक्ष केल्यास शरीर खराब दिसते.
रक्तस्त्राव
प्रसूतीनंतरच्या रक्तस्त्रावाला लिचिना असे म्हणतात. याचा खुप त्रास असतो. हा त्रास वाढल्यास डॉक्टरांकडे जा.
स्तनांची संवेदनशीलता
या काळात स्तनांची संवेदनशीलता वाढल्याने स्तनपान करताना तसेच इतर कोणत्याही स्पशार्मुळे त्रास होतो.
स्वभावात बदल
बाळंतपणानंतर मूड स्वींगचा त्रास धोकादायक असू शकतो.
पावलांचा आकार
बाळंतपणानंतर पावलांचा आकार बदलत असल्याने जुने सँडल, शूज वापरता येत नाहीत. यावर मसाज अथवा पेडीक्युअरचा देखील काही परिणाम होत नाही.
कपड्याचा साईज
बाळंतपणानंतर पोट लगेच कमी होत नसल्याने आवडते कपडे घालता येत नाहीत.
केसगळती
बाळंतपणानंतर केस गळती होते. उपचार करुन व सौंदर्यसाधने वापरुनही फरक पडत नाही.
भुक वाढते
स्तनपानामुळे आईला सतत भुक लागते. बाळाची काळजी व निगा, झोप व भुक हे सर्व सांभाळताना खुप त्रास होतो.
सतत लघवी
बाळंतपणानंतर लघवीवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.
सेक्सची इच्छा
बाळंतपणानंतर सेक्स ची इच्छा कमी होते. काही महिला काही दिवस, काही आठवडे तर काही महिने सेक्स करत नाहीत. तर काहीजणींना बाळंतपणानंतर दोन वर्ष सेक्स करण्याची इच्छा होत नाही.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)