आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ज्या प्रमाणे महिलांच्या सौंदर्यातील काही विशिष्ट गोष्टी पुरुषांना आकर्षित करतात त्याच प्रमाणे महिलांनाही पुरुषांमधील काही विशिष्ट गोष्टी आकर्षित करतात. विशेषकरून पुरुष महिलांच्या बाह्य सौंदर्याकडे आकर्षित होतात मात्र महिलांचे तसे नसते. महिला पुरुषांच्या व्यक्तिमत्वाबरोबरच त्यांच्या वागण्याच्या विशिष्ट पद्धतींकडे आकर्षिल्या जातात. जाणून घ्या महिलांना पुरुषांच्या कोणत्या गोष्टी आकर्षित करतात याविषयी –
१. महिलांना आदरभाव देणारे पुरुष
प्रौढ असो किंवा युवक, तो महिलांचा सन्मान कसा राखतो यावर मुली नेहमी लक्ष देतात. हॉटेलमध्ये खुर्ची ओढून बसण्यास मदत करणारा पुरुष नाही तर अगदी सामान्यपणे चारचौघात तो घरातील महिलांशी कसा वागतो या कडे महिला नक्कीच लक्ष देतात. महिलांना आदरभाव देणारे पुरुष महिलांना आकर्षित करतात.
२. व्यक्तिमत्व
पुरुषाचे व्यक्तिमत्व कसे आहे याकडेही महिला प्रामुख्याने लक्ष देतात. यात पुरुषांची देहबोली , शरीर रचना , मजबूत बांधा , महिलांना आकर्षित करतात. सुटलेले पोट महिलांना आवडत नाही.
३. टापटीपपणा
पुरुष रंगाने अगदी काळा जरी असला तरी त्याचा टापटीपपणा महिलांना आकर्षित करतो. विस्कटलेले केस या पेक्षा व्यवस्थित केस , स्वच्छ आणि नीटनेटके कपडे असतील तर असे पुरुष आकर्षक दिसतात असे अनेक महिलांचे म्हणणे आहे . पुरुषांचे मोठे केस महिलांना आवडत नाहीत.
४. दाढी
महिलांना सर्वात आकर्षित करते ती दाढी. व्यवस्थित ट्रिम केलेली दाढी महिलांना आवडते . तर काही महिलांना क्लीन शेव्ह देखील आकर्षित करते.
५. पादत्राणे
पुरुष पायात कोणत्या प्रकारची पादत्राणे घालतात हे देखील महिला पाहतात. वेगवेगळ्या कपड्याच्या प्रकारावर जर तुम्ही योग्य पादत्राणंच प्रकार निवडत असाल तर महिलांना ते आवडते . कॅज्युअल कपड्यांवर जर साधी स्लिपर घालत असाल तर ते टाळा . महिलांना विशेष करून ते आवडत नाही .