• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

Winters Health : खोकल्यापासून आराम मिळाला नाही, तर घसादेखील राहतो खराब; जाणून घ्या याचे कारण आणि यापासून बचाव

by Sajada
November 26, 2020
in माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Winters

Winters

17
VIEWS


आरोग्यनामा ऑनलाईन-
आपल्या शरीराच्या फंक्शनिंगसाठी नाक, कान आणि घसा (ईएनटी) खूप महत्त्वाचे आहे. शरीराचे हे तीन भाग अनुक्रमे वास, ऐकण्याची व बोलण्याची शक्ती देतात. हिवाळ्यातील(Winters) कोरोना महामारी आणि वाढत्या बॅक्टेरियाच्या संसर्गापासून त्यांचे संरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. घशाची समस्या कशी टाळायची आणि त्यासाठी योग्य उपचार काय आहेत ते जाणून(Winters) घेऊया…

डॉक्टरांकडे जाणे कधी आवश्यक आहे?
लखनऊस्थित ईएनटी (नाक, कान आणि घसा) तज्ञ डॉ. पंकज श्रीवास्तव म्हणतात, ‘नाक आणि घसा हा आपल्या संपूर्ण शरीरात प्रवेश करण्याचा बिंदू आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे एखाद्या व्यक्तीला घशात दुखणे, खाण्यास त्रास, सर्दी किंवा विषाणूचा त्रास होऊ शकतो. जर या समस्येचे 2-4 दिवसांत निराकरण होत नसेल तर आपल्याला जनरल प्रॅक्टिशनरकडे जाणे गरजेचे आहे, परंतु ही समस्या वर्षातून बर्‍याच वेळा राहिल्यास नक्कीच तुम्ही ENT स्पेशॅलिस्टची मदत घ्यावी.

ईएनटी समस्या कशामुळे होतात?
डॉ. श्रीवास्तव यांनी ईएनटी (नाक, कान आणि घसा) या समस्यांसाठी प्रदूषणाला मोठे जबाबदार मानले आहे. ते म्हणतात की, खराब जीवनशैलीमुळे लोकांना त्रास होतो. तंबाखू, पान मसाला, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या गोष्टींमुळे घशाचा कर्करोग होऊ शकतो. पान-मसाले खाल्ल्यानेदेखील म्यूकस फायब्रोसिस नावाचा रोग होऊ शकतो, ज्यामध्ये त्या व्यक्तीचे तोंड उघडणे थांबते. याचा कोणताही उपचार नाही आणि शस्त्रक्रिया उपचारामध्ये समस्यादेखील वाढू शकतात.

घशात समस्या का होतात?
डॉ. श्रीवास्तव म्हणतात की, अनेक वेळा घशात समस्या पोटातील रिफ्लक्स अ‍ॅसिडमुळे होतात. आपल्या फूड पाईपमध्ये एक व्हाॅल्व असताे जाे अ‍ॅसिडला वरती येण्यास प्रतिबंधित करताे. तथापि, काही लोकांच्या शरीरात व्हाॅल्व व्यवस्थित कार्य करत नसेल तर व्हाॅल्व अ‍ॅसिड वरती येते. याला लॅरिंगो थ्रोइंग रिफ्लक्स (एलपीआर) म्हणतात. यामुळे घशात दुखणे, घसा खवखवणे, रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते.

काय आहे उपचार?
याशिवाय गळ्यात टॉन्सिल्समध्ये बरेच पॉकेट्स असतात. यामध्ये आपल्या अन्नातील कण आणि लाळ त्यात मीठ साठले जातात. हे पॉकेट्स बऱ्याचदा संसर्गाचे स्त्रोत बनतात. म्हणूनच, जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते तेव्हा त्या व्यक्तीचा घसा खवखवतो. ईएनटी स्पेशलिस्ट आपल्याला सांगते की, हे टॉन्सिल इन्फेक्शन किंवा रिफ्लक्स अ‍ॅसिडमुळे होत आहे. टॉन्सिल इन्फेक्शन अ‍ॅण्टीबायोटिक्सद्वारे नियंत्रित केले जाते, तर रीफ्लक्स अ‍ॅसिडमध्ये अ‍ॅसिडिटीची औषधे दिली जातात.

घरगुती उपचार
सुरुवातीला घशात खवखव झाल्यास घरगुती उपचारदेखील अवलंबले जाऊ शकतात. डॉ. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, जेवण झाल्यानंतर झोपेमध्ये दरम्यान अडीच ते तीन तासांचे अंतर ठेवा. झोपेच्या आधी हलके अन्न खा. दिवसातून 3 वेळा पोट भरण्याऐवजी 4 ते 5 वेळा हलके जेवण घ्या. दिवसातून तीन वेळा जेवण झाल्यावर, पाण्याने गुळणा करा. कमीत कमी मसालेदार गोष्टी खा. तळण्याचे पदार्थ टाळा.

आपण थंड गोष्टी खाणे थांबवावे?
घशात समस्या उद्भवल्यास बर्‍याचदा लोकांना तांदूळ, दही आणि ताक यांसारख्या थंड गोष्टी न खाण्याचा सल्ला दिला जातो. डॉ. श्रीवास्तव म्हणतात की, घसा खवखवताना काही गोष्टी न खाण्याचे वैज्ञानिक कारण समजत नाही. पूर्व राज्यांमध्ये तांदूळ सर्वांत जास्त खाल्ला जातो, परंतु त्यांचा घसा सर्वकाळ खराब होत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, आपल्याला त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅलर्जी होईल.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsCoughhealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newssore throatWintersअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनखोकलाघसा
beautiful
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

सुंदर, चिरतरुण राहण्यासाठी मुलींनी रात्री घ्यावी ‘ही’ काळजी

June 4, 2019
कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या
सौंदर्य

कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या

December 29, 2019
Jagjerry
Food

गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या

December 31, 2019
Navratri
Food

नवरात्री रेसीपी : मखानाच्या खीरसह बनवा या 2 टेस्टी डिश, झटपट होतात तयार

October 20, 2020

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

14 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.