आरोग्यानामा ऑनलाइन – अनेकजण थंडीचा आनंद घेतात. गुलाबी थंडीचा आनंद घेतला पाहिजे. पण जेव्हा कडाक्याची थंडी पडते तेव्हा शरीराला विविध धोके निर्माण होतात. अति थंडीत स्ट्रोक, रक्तदाब वाढणे, हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. दरवर्षी यामुळे अनेकांचा बळी जातो. यावेळची थंडीसुद्धा देशातच्या अनेक भागात खुपच त्रासदायक ठरत आहे.
हे लक्षात ठेवा
1 हे पेशंट वाढतात
डॉक्टर्स सांगतात की थंडीच्या दिवसांत त्यांच्याकडे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचे येणार्या रूग्णांची संख्या तीनपटीने वाढते. हे वाढत्या थंडीमुळे होते.
2 असा वाढतो धोका
थंडीत शरीराचा रक्तदाब वाढतो, ज्यामुळे रक्त वाहिन्यांमध्ये क्लॉटिंग होऊन स्ट्रोकचा धोका वाढतो. ब्रेन स्ट्रोकचे मुख्य कारण रक्तदाब आहे. रक्तदाब वाढल्याने मेंदूतील नस फाटते अथवा तिच्या अडथळा निर्माण होतो.
3 जास्त पाणी प्या
थंडीच्या दिवसात रक्त घट्ट होते. रक्ताच्या वाहिन्या अकुंचित होतात. रक्ताचा दाब वाढतो. अशावेळी थंडी आणखी वाढल्याने अथवा जास्तकाळ असेच वातावरण राहिल्याने उच्च रक्तदाबाच्या रूग्णांची स्थिती गंभीर होते. थंडीत अनेक लोक पाणी कमी पितात, यामुळे रक्त घट्ट होते. म्हणूनच डॉक्टर थंडीमध्ये जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात अथवा द्रव पदार्थ सेवन करण्यास सांगतात.