आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळा(Winter ) हा खाण्या-पिण्याचा ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये एक अशी गोष्टी आहे जी मोठ्या आवडीने सेवन केली जाते, ती म्हणजे शेंगदाणे म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा. शेंगदाण्यांमध्ये ती सर्व पोषकतत्व आढळतात, जी बदामात असतात. यासाठी यास स्वस्त बदामसुद्धा म्हटले जाते. शेंगदाण्यात आरोग्याचा खजिना दडलेला आहे. हिवाळ्यात(Winter )शेंगदाणे का खावेत, ते जाणून घेवूयात…
भरपूर प्रोटीन –
यामध्ये प्रोटीन भरपूर असतात. जे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. तसेच जे दूध पित नाहीत, त्यांच्यासाठी हा दूधाला पर्याय आहे.
वजन कमी करणे –
शेंगदाणे खाल्ल्याने खुपवेळ भूक लागत नाही. पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
हृदयरोग –
शेंगदाण्यात अँटीऑक्सीडेंट्स आणि मिनरल्स भरपूर असल्याने स्ट्रोक आणि हृदयरोगांचा धोका कमी होतो. यातील ट्रिप्टोफॅन डिप्रेशनची समस्या दूर करण्यात उपयोगी आहे.
कँसरचा धोका कमी –
यात फायटोस्टेरॉल असते ज्यास बीटा-सीटोस्टेरोल म्हणतात. कँसरचा धोक कमी करण्यासाठी हे उपयोगी असते.
डायबिटीज –
शेंगदाण्यात मँगेनीजसह मिनरल्स आढतात, हे कार्बोहाइड्रेट, मेटाबॉलिज्म, कॅल्शियम अब्सॉर्प्शन आणि ब्लड शुगर नियंत्रित करतात.को रेगुलेट करते हैं.
बॅड कोलेस्ट्रॉल –
यामध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. यातील ओलेक अॅसिड ब्लडमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. कोरोनरी आर्टरी डिसीजपासून रक्षण करते.
फर्टिलिटी वाढते –
शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फोलिक अॅसिड असते, जे महिलांमध्ये फर्टिलिटी चांगली करते. यामुळे गर्भाचा चांगला विकास होतो. बाळाला अस्थमा होण्याचा धोका कमी होतो.
चेहर्याची चमक –
शेंगदाणे आरोग्यासह स्कीनसाठी सुद्धा खुप लाभदायक आहेत. यातील मोनोसॅच्युरेटेड अॅसिड स्किन हायड्रेट ठेवून ग्लो वाढवते.
मजबूत इम्युनिटी –
शेंगदाण्यात व्हिटॅमिन सी सुद्धा आढळते, जे हिवाळ्यात होणारी सर्दी, खोकला, तापापासून रक्षण करते. याच्या नियमित सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होते. शरीरात एनर्जी वाढते.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.