आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Winter Health | डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. हे जलद वजन कमी करण्यास देखील मदत करते. हिवाळ्यात आहारात (Winter Health) कोणत्या डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करू शकता ते जाणून घेवूया (detox drinks drink).
१. ओव्याचे पाणी – Ajwain Water
ओव्याचे पाणी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. यासाठी एक चमचा ओवा पाण्यात उकळवा. यानंतर ते पाणी कोमट करून प्या. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.
२. सैंधव मीठ – Rock Salt
एक कप गरम पाण्यात सैंधव मीठ मिसळा. या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. हे पाणी शरीराला डिटॉक्स करते.
३. तुळशीचे पाणी – Tulsi Water
तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. यासाठी तुळशीची पाने रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून सेवन करा. (Winter Health)
४. आल्याचे पाणी – Ginger Water
हिवाळ्यात आल्याचे पाणी पिऊ शकता. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. यासाठी आल्याचे तुकडे सुमारे १० तास भिजत ठेवा. यानंतर ते पाणी सेवन करा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Winter Health | detox drinks drink these 4 drinks daily to detox the body in winter
Weight Loss Tips | या ४ प्रकारे करा ओव्याचे सेवन, मिळेल इलियाना डिक्रूजसारखी Zero Figure
High BP | आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे ‘हाय ब्लड प्रेशर’; बचावासाठी सेवन करा ही ३ फळे