आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी सध्या वेगन डाएट सर्वाधिक चर्चेत आहे. वजन कमी करण्यासह त्वचेवर ग्लो आणण्यासाठी वेगन डाएट करण्याकडे कल वाढत आहे. मात्र, हे डाएट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने केले तरच फायदा होतो.सध्या वेगन डाएटला जास्त पसंती मिळत आहे. आहारतज्ज्ञ देखील वेगन डाएटचे विविध फायदे इच्छूकांना सांगतात. प्लांट बेस्ड फूडचा समावेश वेगन डाएटमध्ये करण्यात येतो. यामध्ये प्राण्यांपासून मिळणाऱ्या कुठल्याही पदार्थांचा समावेश केला जात नाही. शिवाय, डेअरी प्रॉडक्टलाही यामध्ये थारा नाही. हे डाएट फिटनेससाठी खूप फायदेशीर असल्याचे काही आहारतज्ज्ञ सांगतात, अशी माहिती द हेल्थ साइट डॉट कॉमने दिली आहे.
मागील काही वर्षांपासून वेगन डाएटचा मोठा ट्रेन्ड आहे. अनेक सेलिब्रिटीही हे डाएट फॉलो करत असल्याचे दिसून येत आहे. या डाएटमध्ये केवळ प्लांट बेस्ड पदार्थांचा समावेश केला जात असल्याने विविध संक्रमणांपासून बचाव होतो. हे डाएट फॉलो करण्याचा सर्वात जास्त फायदा म्हणजे यामुळे वजन कमी होते. शिवाय वजन नियंत्रणात राहते. या डाएटमध्ये झाडांपासून मिळणाऱ्या म्हणजेच कडधान्य, डाळी, फळं, भाज्या, सलाद इत्यादींचा पदार्थांचा समावेश असतो.
वेगन डाएट फॉलो केल्याने विविध फायदे होतात. त्यापैकी वजन कमी होणे हा सर्वात मोठा फायदा आहे. हे डाएट वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगले मानले जाते. यामध्ये कॅलरी आणि फॅट कमी प्रमाणात असल्याने वजन नियंत्रणात राहते. शरीरातील एक्सट्रा फॅटही कमी होते. तसेच मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. या डाएटमुळे एनर्जीही वाढते. वेगन डाएटमध्ये प्रोटीन आणि आयर्न भरपूर असल्याने शरीराला जास्त एनर्जी मिळते. तसेच शरीराला मजबूती आणि ताकद मिळते. तसेच वेगन डाएटमुळे पचनक्रिया सुद्धा मजबूत होते. वेगन डाएटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया मजबूत आणि चांगली होते. याशिवाय चांगली झोपदेखील येते. यामध्ये केळी, बदाम, रताळे यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी ६ आणि टिड्ढप्टोफिन असल्याने झोप चांगली येते. हे अँटी-ऑक्सिडेंट डाएट आहे. वेगन डाएटमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ नष्ट होऊन बॉडी डीटॉक्स होते.