आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही लोकांना झोपेत बडबड करण्याची सवय असते. काही लहान मुले, तरूणदेखील झोपेत बडबड करताना दिसतात. काही व्यक्ती झोपेमध्ये कुणाच्या तरी प्रश्नांना उत्तरे देत असतात. मात्र, झोपेत केलेली ही बडबड, जाग आल्यानंतर लक्षात राहत नाही. झोपेत बडबडणे एखाद्या आजाराचे लक्षणदेखील असू शकते. यामागील नेमकी कारणे आणि लक्षणे याबाबत आपण जाणून घेवूयात.
हा आजार नाही
साधारणपणे झोपेत बडबडणारी व्यक्ती एकावेळेस ३० सेकंदापेक्षा अधिक वेळ बोलू शकत नाही. या सवयीला झोपेत अस्वाभाविक व्यवहार करणे म्हणजेच एक प्रकारचे पॅरासोमनिया असे म्हटले जाते. हा आजार नसून यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
यांना असते सवय
विविध वयोगटातील व्यक्ती झोपेत बडबड करतात. यामध्ये ३ ते १० वर्ष वय असलेल्या मुलांची संख्या जास्त असते. ५ टक्के संख्या ही मोठ्यांची असते. काहीजण तर बोलता बोलता झोप लागल्यानंतर अर्धवट राहिलेले बोलणे झोपेत पूर्ण करतात. पण असे कधीतरी घडते.
काय आहेत झोपेत बोलण्याची लक्षणे
या सवयीची काही चरण आहेत. पहिलजे चरण हे झोपेचे सुरवातीचे असते. यामध्ये झोप येण्याची स्थिति असते. या स्थितीमध्ये कोणतीही व्यक्ति ५ ते १० मिनिटांपर्यंत असते. यानंतर व्यक्ती पुढच्या चरणामध्ये प्रवेश करते. नंतरच्या चरणामध्ये व्यक्ति कमीत-कमी २० मिनिटांसाठी असते. यामध्ये मेंदू अधिक सक्रिय असतो. यावेळच्या मेंदूच्या क्रियांना स्लिप स्पिंडल म्हणतात. यानंतरच्या चरणात व्यक्ति गाढ झोपते. या काळात मेंदू जास्त कार्यरत नसतो, या काळात शरीर आणि मेंदू रिलॅक्स असतो. या काळात आजूबाजूचे भान नसते. चौथ्या चरणात मेंदू सक्रिय असतो. यामध्ये डेल्टा स्लीप येते.
ही आहेत कारणे
वाईट स्वप्न हे झोपेत बडबड करण्याचे कारण असू शकते. आपण विचार करत असलेली घटना स्वप्नात येऊ शकते. झोपेत बडबड केल्याने कोणतेही नुकसान होत नसले तरी हे लक्षण एखाद्या झोपेच्या विकाराचे अथवा आरोग्य समस्येचे संकेत असू शकतात.
हे आहेत उपाय
* झोपेत प्रमाणापेक्षा अधिक बोलण्याची सवय असल्यास उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी सायकोथेरेपिस्टचा सल्ला घ्या. झोपेचा विकार, दुर्बलता, चिंता अथवा तणाव ही कारणे यामागे असू शकतात.
* झोपेत बडबड करताना कुणाला तरी जागे करण्यास सांगा, म्हणजे पुन्हा योग्य पद्धतीने झोपता येऊ शकते.
* तणाव कमी करा. योगा करा. यामुळे मन शांत होईल. मन शांत असेल तर झोपेत बिलकूल बडबड केली जाणार नाही. झोपण्यापूर्वी चहा, कॉफीचे सेवन करू नका.
————————————