आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डायबिटीस, ब्लडप्रेशन, हृदयरोग या समस्या चाळीशी अथवा पन्नाशीनंतर होतात, असे समले जात होते. परंतु, सध्या कमी वयातील मुला-मुलींनाही हे आजार होऊ लागले आहेत. बदललेली जीवनशैली आणि आहार यास कारणीभूत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा सर्वात जास्त परिणाम तरूण पीढीवर होत आहे. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या त्यांच्यात जास्त प्रमाणात दिसून येते.
ही आहेत कारणे
1 जास्तीत जास्त वेळ कम्प्युटर आणि स्मार्ट फोनवर घालवल्याने डायबिटीज, हाय ब्लडप्रेशर इत्यादी आजार वाढत आहेत.
2 करिअरबाबतचा ताणतणाव, नोकरी टिकवण्याची स्पर्धा, यामुळे उच्च रक्तदाब, हृदय रोग होतात.
3 जंक फूड्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त ट्रान्स फॅट्सचा चिकटपणा असतो. हे चिकट पदार्थ हृदयाच्या नसांना ब्लॉक करतात. कालांतराने हृदय रोग होऊ शकतो.
4 व्यायामाचा अभाव, चालण्याऐवजी वाहनांचा जास्त वापर, हे देखील याचे एक कारण आहे.
हे लक्षात ठेवा
* खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घ्या.
* आहारात दूध आणि दुधाचे पदार्थ, फळे, भाज्या आणि धान्याचा समावेश करा.
* नियमीत व्यायाम करा.
* तणावाला सकारात्मक विचारांनी नियंत्रित करा.
Visit : arogyanama.com