• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ऑफबिट सौंदर्य

हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते ? जाणून घ्या

by Sajada
December 28, 2020
in सौंदर्य
0
winter

winter

424
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- हिव्याळ्यात(winter) आपण बघतो की, आपली त्वचा ही कोरडी पडत असते. अनेकांना असा प्रश्नही पडत असेल की, हिवाळ्यात(winter)असं नेमकं कशामुळं होतं. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

त्वचा कोरडी का पडते ?

आपली त्वचा म्हणजे एक संरक्षणात्मक कवच आहे. याचे दोन भाग असतात. अंत:त्वचा (डर्मिस) आणि बाह्यत्वचा (इपीडर्मिस) असे हे दोन भाग आहेत. बाह्यात्वचेत पेशींचे एकावर एक अनेक थर असतात. हेच थर जीवाणू, विषाणू आणि इतर रोगसंक्रमणासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करतात. सर्वात आतील थर जो असतो तो नियमितपणे नव्यानं तयार होत असतो. बाहेरील थर मृत होतो. अंत:त्वचेत मेदाम्लाचा थर असतो. या थरात तैलग्रंथी (सेबॅशियस ग्लॅंड) आणि घर्म ग्रंथी (स्वेट ग्लँड) असतात. तैलग्रंथीत सिबल स्रवले जातात. हे सिबम केसांच्या बीजकोषाला तेल पुरवतं. या केसाच्या बीजकोषातून केसाची निर्मिती होते, केस आणि तेल/सिबम ग्रंथीच्या नलिकेतून त्वचेवर येतात. त्यामुळं त्वचा मऊ रहाते. घर्मग्रंथीमध्ये घाम स्रवला जातो. घामात युरिया, अमिनो आम्ल, पाणी, उष्णता असते. त्यामुळं शरीरातील तापमान व क्षार नियमनाचं काम सुरळीत सुरू असतं.

थंडीत त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर हा मृत होतो आणि झडून जातो. त्वचेला रखरखतेपणा येतो. यालाच आपण त्वचा फुटली असं म्हणतो. याशिवाय वातावरणातील तापमान आणि हवेतील आर्द्रता कमी झाल्यानं त्वचेतून ओलसरपणा बाहेर टाकला जातो, तैलग्रंथींचं कार्य मंदावतं आणि त्वचेला कोरडेपणा येतो.

 

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

Tags: Skinskin dryWinterत्वचा कोरडी
मुंबईत साडेतीन हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत
माझं आराेग्य

मुंबईत साडेतीन हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत

March 8, 2019
ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी
माझं आराेग्य

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

July 9, 2019
cumin
Food

जीरं आणि गुळाच्या सेवनाने ’या’ 4 गंभीर समस्या राहतील दूर, जाणून घ्या फायदे

September 30, 2020
गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
माझं आराेग्य

गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय

August 18, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

2 hours ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

3 hours ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

7 hours ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.