आरोग्यानामा ऑनलाइन टीम : डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्यासाठी ते प्रिस्किप्शन लिहून देतात. हे प्रिस्किप्शन लिहिण्यास सुरूवात करण्यापूर्वी ते वर आरएक्स असे इंग्रजीत वरखाली जोडून लिहितात. याचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. मुळात कोणती औषधे लिहून दिलीत, हे डॉक्टरांच्या अक्षरामुळे लोकांना समजत नसल्याने आरएक्सचा अर्थ शोधण्याचा कुणीच प्रयत्न करत नाही. या आरएक्सचा अर्थ आपण आज जाणून घेणार आहोत.
आरएक्ससारखे देवाचे डोळे
आरएक्स हे लॅटीन भाषेतील एक चिन्ह असून त्याचा इंग्रजीमघ्ये टेक आणि मराठीत घेणे असा अर्थ होतो. काहीजण सांगतात की, अनेक डॉक्टरांनाही याचा अर्थ माहिती नसतो. मात्र, यात किती सत्यता हे वादातीत आहे. आरएक्सचा दुसरा एक अर्थ म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात प्राचीन काळापासून मोठे योगदान असलेल्या इजिप्तमध्ये होरस नावाची देवता असून या देवाचे डोळे हे आरएक्स या चिन्हासारखे भासतात. हे डोळे आरोग्याचे प्रतिक असल्याचे येथील लोक मानतात. म्हणूनच डॉक्टर प्रिस्किप्शनवर आरएक्स लिहितात, असे म्हटले जाते.
इजिप्तमध्ये पहिला दवाखाना
इजिप्तचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान हे जगभरात प्रसिद्ध असून प्राचीन काळापासून येथे विविध आजारांवर गोळ्या दिल्या जातात. तब्बल आठव्या शतकात येथे पहिला दवाखाना सुरू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर १७ व्या शतकात पहिला दवाखाना सुरू झाला आहे, यावरून इजिप्तचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अधोरेखित होते.
Visit : Arogyanama.com