पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – जेव्हा आपण रुग्णालयात जातो तेव्हा डॉक्टरांना आपण नेहमी पांढऱ्या कोटमध्ये पाहतो. डॉक्टर म्हटले की, आपल्याला लगेच आठवते की, पांढरा परिधान केलला कोट आणि त्यांच्या गळ्यात अडकवलेले स्टेथोस्कोप. तुम्हाला माहित आहे का ? डॉक्टर पांढरा कोट का घालत असेल. यामागचे खरे कारण हे आहे…
अनेकांना प्रश्न पडत असेल की रुग्णालयामध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला कायम पांढऱ्या कोटमध्ये दिसतात. मात्र, तेथिल काम करणारे कर्मचारी पण कायम पांढऱ्या कपड्यांमध्ये का दिसतात ? यामागे एक खास कारण आहे.
रुग्ण आणि डॉक्टर किंवा रुग्णालयातील अन्य कर्मचारी यांच्यातील फरक ओळखता यावा यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पांढऱ्या कोटचा वापर करतात. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि प्रामाणिकपणांच प्रतिक आहे. त्यामुळे कायम सकारात्मक वातावरण असावा, यासाठी या रंगाला प्राधान्य दिले जाते.
पांढऱ्या रंगामुळे शरीराचे तापमान स्थिर राहते. त्याप्रमाणेच पांढरा रंग स्वच्छतेचे देखील प्रतीक आहे. महत्वाचे म्हणजे पांढऱ्या कोटासोबतच त्याला असलेले मोठे खिसेदेखील महत्वाचे असतात. या खिशांमध्ये डॉक्टरांना आवश्यक असलेलं सामान ठेवता यावे. यासाठी त्यांचे खिसे मोठे असतात.
सध्याच्या काळामध्ये डॉक्टरांची ओळख पांढरा कोट म्हणूनच झाली आहे. याला पांढरा कोट न म्हणता अॅप्रिन म्हटले जाते. हा अॅप्रिन गुडघ्यापर्यंत लांब असून तो सुती असतो. हा कोट सूती लिनन किंवा सूती पॉलिएस्टर यांच्यापासून तयार केले जाते.