आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बहुतांश लोकांचा असा समज असतो की, आरोग्यदायी आहार हा चविष्ठ आणि चमचमीत नसतो. परंतु, हे चुकीचे आहे. आरोग्यदायी आहारसुद्धा तुम्ही चविष्ठ तयार करून खाऊ शकता. यामुळे शरीराची उर्जा वाढेल, रोगप्रतिकारशक्ती वाढेल, वजन कमी होईल, असे अनेक फायदे होतील. त्यामुळे हेल्दी फूड आणि टेस्टी फूड यामध्ये कोणताही फरक नाही, हे लक्षात ठेवा.
हे गैरसमज दूर करा
१ हेल्दी फूड म्हणजे नुसते उकडलेले, वाफवलेले, कमी तिखट-मिठाचे, बिनचवीचे हा गैरसमज आहे.
२ हेल्दी फूडही चमचमीत आणि टेस्टी असते. तुम्ही ते कसे बनवता यावर सर्व अवलंबून आहे.
३ हेल्दी फूडच जास्त टेस्टी असते. त्यामागचा नकारात्मक विचार आणि आपले पूर्वग्रह मात्र सोडायला हवेत, असे संशोधक सांगतात.
हे आहेत फायदे
१ यामुळे आरोग्य सुधारते.
२ अनेक आजार दूर ठेवू शकता.
३ एनर्जी लेव्हल वाढते.
४ रोगप्रतिकारशक्ती वाढते.
५ वेटलॉससाठीचा हा महामंत्र आहे.
Visit : arogyanama.com