• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

WHO Global Center | जगभरात होणार आयुर्वेदाची वाहवा, अर्थसंकल्पात तरतूद; आता भारतात उभारणार पहिले WHO-ग्लोबल सेंटर

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
February 4, 2022
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
WHO Global Center | who global center for traditional medicine will be established soon as budget is allotted for ayush ministry

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – WHO Global Center | कोरोना महामारीच्या (Coronavirus) आगमनानंतर भारतातील प्राचीन वैद्यकीय पद्धतींची मागणीही जगात वाढली आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील देशांनीही या महामारीमध्ये आयुर्वेदाच्या उपायांचा (Ayurvedic Treatment) मोठ्या प्रमाणात वापर केला आणि त्याचे आरोग्यदायी फायदेही झाले. आयुर्वेदिक औषधांपासून, घर आणि घराबाहेर असलेल्या वनस्पती आणि झाडांचा वापर करण्यात आला. (WHO Global Center)

 

आयुर्वेदाबाबत आता भारतात मोठे काम केले जाणार असल्याने त्यामुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाची स्वीकारार्हता तर वाढेलच, शिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत या वैद्यकीय पद्धतीचे नवीन संशोधन, आणि प्रसार करण्याची संधीही मिळेल. यावेळी, भारत सरकारने जारी केलेल्या 2022 च्या अर्थसंकल्पात, WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी त्यावर काम सुरू होणार आहे. (WHO Global Center)

 

डब्ल्यूएचओने 2020 मध्येच भारतामध्ये जगातील पहिले डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन (Global Centre for Traditional Medicine in India) च्या स्थापनेबाबत घोषणा केली होती. यावेळी केंद्र सरकारने आयुष मंत्रालयासाठी 3050 कोटींची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे पारंपारिक औषधे विशेषत: आयुर्वेदासाठी हे जगातील पहिले आणि एकमेव डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर असेल. त्याचा थेट परिणाम देशातील पारंपारिक औषध क्षेत्राला चालना देण्यावर तसेच त्यामधील गुंतवणुकीवर दिसून येईल.

यामुळे आयुर्वेद हा एक उत्तम वैद्यकीय पर्याय म्हणून उदयास येईलच, शिवाय जागतिक वैद्यकीय क्षेत्रात भारताची विशेष ओळख निर्माण होईल. आता भारतापुरती मर्यादित असलेल्या या वैद्यकीय पद्धतीत परदेशी सहकार्यही वाढणार आहे.
यासोबतच आरोग्य क्षेत्रातील आयुर्वेदाचे फायदे इतर देशांनाही मिळतील.

 

WHO-Global Center for Traditional Medicine in India हे विशेषत: भारतात पारंपारिकपणे वापरल्या जाणार्‍या औषध प्रणालीचा विस्तार आणि प्रसार करण्यासाठी केंद्र असेल.
आयुर्वेद ही भारतामध्ये प्राचीन काळापासून अवलंबलेली वैद्यकीय पद्धत आहे. आयुर्वेदाबाबत इतर देशांची फार पूर्वीपासून विशेष आस्था आहे, मात्र आता डब्ल्यूएचओने सुद्धा याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अ‍ॅधानोम गेब्रेयसस म्हणाले होते की आयुर्वेदासारख्या पारंपारिक औषध पद्धतींचा लोकांच्या आरोग्याच्या काळजीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे, परंतु त्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही.
आयुर्वेद पुराव्यावर आधारित असल्याने ही पारंपारिक औषधी पद्धत अतिशय उपयुक्त आहे.

 

त्याच वेळी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले होते
की भारताच्या या पारंपारिक संपत्तीचा उर्वरित जगालाही फायदा होऊ शकतो.

 

आयुर्वेदाची माहिती पुस्तके आणि हस्तलिखितांमधून बाहेर आणण्याबरोबरच,
घरगुती उपचाराने आधुनिक गरजा पूर्ण होतीलच शिवाय प्राचीन वैद्यकीय ज्ञान क्षेत्रात भारतात होत
असलेल्या नवीन संशोधनालाही मदत होईल.
अशा स्थितीत भारतात उभारले जाणारे हे जागतिक केंद्र आयुर्वेदाला पुढे नेण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.

 

कोरोना महामारीच्या काळातच भारतातून आयुर्वेदिक उत्पादनांची (Ayurvedic Products)
निर्यात सुमारे 45 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
यामध्ये हळद, आले, भारतातील मसाले, आयुर्वेदिक इम्युनिटी बुस्टरची मागणी होती.
अशा स्थितीत एकीकडे कोरोना लसीकरण (Vaccination) आणि दुसरीकडे आयुर्वेदिक उपाय जगाने अवलंबले आहेत.
त्यामुळे या केंद्राच्या निर्मितीनंतर या दिशेने बरीच प्रगती अपेक्षित आहे.

भारतात अगोदरपासूनच आयुर्वेदावर काम
भारतात आयुर्वेदावर खूप काम केले जात आहे. आयुष मंत्रालयाच्या प्रयत्नांव्यतिरिक्त,
NSRIR आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद दिल्ली शिवाय गुजरात आणि
राजस्थानमध्ये दोन नवीन आयुर्वेद संस्था अपग्रेड करण्यात आल्या आहेत.

 

एवढेच नाही तर शिक्षण मंत्रालय आणि यूजीसीला पंतप्रधानांकडून आयुर्वेद भौतिकशास्त्र आणि
आयुर्वेद रसायनशास्त्रातील नवीन संधी शोधण्यास सांगितले आहे.

 

Web Title :- WHO Global Center | who global center for traditional medicine will be established soon as budget is allotted for ayush ministry

 

हे देखील वाचा 

 

World Cancer Day 2022 | कॅन्सरचा धोका वाढवू शकतात ‘या’ 5 गोष्टी, आजपासूनच सेवन करा बंद, जाणून घ्या

 

World Cancer Day 2022 | पुरुषांमध्ये ‘ही’ 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

 

Blood Sugar | मधुमेहात सर्वात जास्त प्रभावित होतात ‘हे’ अवयव, वेळेवर नाही केले नियंत्रण तर होऊ शकतात डॅमेज; जाणून घ्या सविस्तर

Tags: Ayurveda DoctorsAyurvedicAyurvedic ProductsAyurvedic treatmentBudgetCentral governmentCoronavirusGlobal Centre for Traditional Medicine in Indiagovernment of indiaIndialatest marathi newslatest news on WHO Global Center Newslatest WHO Global Centermarathi in WHO Global Center NewsMinistry of AyushNSRIRPM Narendra Moditoday’s WHO Global Center NewsVaccinationWHOWHO Global CenterWHO Global Center NewsWHO Global Center News marathi newsWHO Global Center News today marathiWHO Global Center todayWHO Global Center today NewsWHO GuidelineWHO-Global Center for Traditional Medicine in IndiaWorld Health Organizationअर्थसंकल्पआयुर्वेदिक उत्पादनआयुर्वेदिक उपचारआयुष मंत्रालयआलेकेंद्र सरकारकोरोनाकोरोना लसीकरणग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिजागतिक आरोग्य संघटनाडब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटरपंतप्रधान नरेंद्र मोदीप्राचीन वैद्यकीयभारतभारत सरकारलसीकरणहळद
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention
ताज्या घडामाेडी

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

by Nagesh Suryawanshi
May 25, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Sciatica Symptoms | सायटिका ही शरीरातील सर्वात मोठी नस (Nerve) आहे जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत पसरलेली...

Read more
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Diabetes Control | kundru Ivy Gourd tondli leaves can control blood sugarknow how to consume it

Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ‘या’ वनस्पतीच्या पानांचे करा सेवन, शुगर राहील नॉर्मल

May 25, 2022
Lady Finger For Diabetic Patients | lady finger for diabetic patients health benefits of eating lady finger

Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर फायदे

May 25, 2022
Reduce Bad Cholesterol Naturally | according to research 4 easy and effective ways to reduce bad cholesterol naturally

Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल

May 25, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021