आरोग्यनामा ऑनलाईन टीम-
१) कडुनिंब :
कडुनिंबाचे पाने ताकात पिसून लेप तयार करा. हा लेप त्वचेवर लावा आणि वाळल्यावर धुऊन टाका. त्याचबरोबर तुम्ही
कडुनिंबाचे तेलही वापरू शकता. कडुनिंबाचा ज्यूस पिणेही हे पांढरे डाग घालवण्यासाठी उत्तम आहे.
२) नारळाचे तेल :
नारळ तेल हे त्वचेला पुन्हा पूर्वीसारखं करण्यात मदत करतं. यात जीवाणूरोधी आणि संक्रमण विरोधी गुण आढळतात. प्रभावित त्वचेवर दिवसातून २ ते ३ वेळा नारळाच्या तेलाने मसाज करणे फायद्याचे ठरेल.
३) तांबा :
शरीरावर असणाऱ्या पांढरे डाग घालवण्यासाठी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यावे. यामुळे तुमच्या शरीरावरील पांढरे डाग कमी होतील.
४) लाल माती :
लाल मातीमध्ये जास्त प्रमाणात तांब आढळते. जे मेलनिन निर्मिती आणि त्वचेला पूर्ववत करण्यात मदत करतं. आल्याच्या रसात लाल मातीचे लेप तयार करून प्रभावित त्वचेवर लावणे फायद्याचे ठरेल.