आरोग्यनामा ऑनलाइन टीम – White Hair | सध्याच्या युगात पांढर्या केसांची समस्या इतकी सामान्य झाली आहे की प्रत्येक वयोगटातील लोक त्याला बळी पडतात. कमी वयात केस पिकल्यामुळे अनेकजण टेन्शन, स्ट्रेस (Tension, Stress), लाजिरवाणेपणा आणि कमी आत्मविश्वासाला बळी पडतात. यासाठी केमिकलयुक्त हेअर डायचा वापर केला जातो, मात्र त्यामुळे केस खराब होऊ शकतात. (White Hair)
लहान वयात पांढरे केस करत आहेत त्रस्त
केस काळे करण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही, तुम्ही नैसर्गिकरित्या पांढरे केस पुन्हा काळे करू शकता. चला जाणून घेऊया अशी कोणती गोष्ट आहे जी केसांचा काळेपणा परत आणण्यासाठी वापरली जाते.
पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी उपाय
1. मेथीदाणे (Fenugreek) रात्री पाण्याने भरलेल्या भांड्यात भिजत ठेवा, दुसर्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट तयार करा आणि डोक्याला लावा, असे काही दिवस केल्यास केसांचा पांढरेपणा निघून जाईल. (White Hair)
2. मेथीच्या औषधी गुणधर्मांची अनेकदा चर्चा केली जाते, जर तुम्हाला तुमचे केस पुन्हा काळे करायचे असतील तर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड होऊ द्या. आता या पाण्याने केस धुवा.
3. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मेथीचा भरपूर वापर केला जातो, जर तुम्ही यासोबत गुळाचे सेवन केले तर केस पांढरे होण्याच्या समस्येपासून लवकरच सुटका मिळेल. याशिवाय केसगळती रोखण्यासाठीही मेथी खूप गुणकारी आहे.
4. मेथीदाणे बारीक करून पावडर तयार करा, आता त्यात लिंबाचा रस (Lemon Juice) मिसळून पेस्ट तयार करा.
आता ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. यामुळे पांढर्या केसांची समस्या कमी वयातच दूर होईल.
5. खोबरेल तेल (Coconut Oil) त्वचा (Skin) आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते,
यासोबत मेथीदाणे बारीक करून डोक्याला लावल्यास केस पांढरे होतातच, शिवाय केस गळणे आणि कोंडाही दूर होतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- White Hair | fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice
Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका
Healthy Heart | हृदयाच्या आजाराची भीती वाटते का? मग शरीरात होऊदेऊ नका या न्यूट्रिएंटची कमतरता
Vitamins For Women | महिलांसाठी अतिशय आवश्यक आहे ‘हे’ व्हिटॅमिन्स, जवळपासही येणार नाहीत अनेक आजार