आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्याकडे महिला पुरूषांच्या बरोबरीने व्यायाम करण्यासाठी सर्वच व्यायाम प्रकार करताना दिसतात. परंतु, तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार सर्वच व्यायाम हे महिलांसाठी नसतात. त्यामुळे महिलांनी त्यांच्यासाठी आवश्यक असलेलेच व्यायाम केले पाहिजेत. महिलांच्या व्यायामाशी संबंधित गरजा वेगळ्या असतात. काही व्यायामांसाठी त्यांचे शरीर अनुरूप नसते.
यासाठी महिलांनी व्यायाम करण्यापूर्वी आपल्याला कोणते व्यायाम प्रकार अनुकूल आहेत याची माहिती करून घेतली पाहिजे. कारण सरसकट सर्वच व्यायाम केल्याच त्याचा त्रासही होऊ शकतो.महिलांनी पोटाचा खालचा भाग बळकट करणारा व्यायाम करावा. बाळंतपणाच्या वेळी पोटाच्या या भागानेच त्यांना अधिक जोर लावावा लागतो, त्यामुळे हा भाग कमजोर पडतो. तसेच या वेळी पाठीवरही जोर पडतो. तसेच कोर मसल्ससाठी व्यायाम करणेसुद्धा महिलांसाठी आवश्यक ठरते.
यामुळे शरीराचा वरचा भाग म्हणजेच धडाला बळकटी मिळते. महिलांचे मणक्याचे हाड अत्यंत लवचीक असते. त्यामुळे वय वाढण्यासोबतच शरीराच्या अलाइनमेंटवर पडणा-या वाईट परिणामांना रोखण्यासाठी हे गरजेचे आहे. शिवाय, महिलांच्या शरीरात लीन मसल्स कमी असतात, त्यामुळे त्यांचे स्नायूही व्यायाम करताना पुरुषांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. हार्मोन्समुळे महिलांच्या शरीरात फॅटचे विभाजन पुरुषांच्या तुलनेत वेगळे असते. महिलांच्या शरीरात आढळून येणारे अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन मासिक पाळीनुसार कमी-जास्त असतात. त्यामुळेच महिलांमध्ये फूड क्रेव्हिंग, सूज येणे आणि भावनात्मक चढ-उतार येतात.