आरोग्यानामा ऑनलाइन टीम : आपल्याकडे दोन प्रकारची माणसे आढळतात. काही जण डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल डिलिव्हरी करा, असा आग्रह धरतात, तर काहीजण कळा सोसणे अशक्य असल्याचे सांगत सरळ सिझर करण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारतात. खरं तर नॉर्मल आणि सिझर मधील फरक व धोके ज्यांना माहित नसतात तेदखील अशावेळी केवळ ऐकीव माहितीवर डॉक्टरांकडे आग्रह करत असतात. खरंतर हे सर्व निर्णय डॉक्टरांनीच घ्यायचे असतात. तरीही सर्वात सुरक्षित डिलिव्हरी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
काय सांगतात संशोधक
1 प्रसुतीसाठी फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरीच्या तंत्राचा वापर करताना आलेल्या अडचणी जर नीट हाताळता आल्या नाहीत, तर त्यामुळे होणारा धोका सिझेरिअन प्रसुतीपेक्षा तब्बल पाच पटींनी वाढतो. त्यामुळे बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या जीवाला धोका वाढतो.
2 शास्त्रज्ञांनी दहा वर्षे दोन लाख डिलिव्हरींचा अभ्यास करून निष्कर्ष काढला असता असे आढळून आले की, नॉर्मल डिलिव्हरीत फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरी तंत्राचा वापर करताना अचानक आलेल्या अडचणींमुळे सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जास्त वेळा तज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. तातडीची मदत पुरवावी लागली.
Visit : arogyanama.com