कोणत्या वेळेस येणारा हार्टअटॅक अधिक गंभीर?

हार्टअटॅक

आरोग्यनामा ऑनलाईन –बललेल्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कामाचा ताण, स्पर्धा, अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड, मानसिक ताणतणाव, खाण्यापिण्याकडे होणारे दुर्लक्ष, चुकीचा आहार, झोप पूर्ण न होणे यामुळे हार्ट अटॅकसह मधुमेह, ब्लडप्रेशन असे अनेक आजार आज बळावत चालले आहेत. त्यातच हार्ट अटॅकने प्रौढांसह तरूणांनाही ग्रासले आहे. हार्ट अटॅक येण्याची भिती अनेकांना सतत जाणवते. खरं तर हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो. अभ्यासकांच्या अहवालानुसार, सकाळी येणारा हार्ट अटॅक रात्री येणाऱ्या हार्ट अटॅक किंवा कार्डिआक अरेस्टच्या तुलनेत जास्त गंभीर असतो. हार्ट अटॅकपासून ते अ‍ॅलर्जीसारख्या आजारांमध्ये एखादी खास वेळ आजाराच्या गंभीरतेला कशी प्रभावित करते, याबाबत एका संशोधनाच्या अहवालात माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये म्हटले आहे की, शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेची प्रतिक्रिया ज्यात स्पेशलाइज्ड पॅथोजन फायटिंग सेल्स असतात, ते अनेक आठवड्यात विकसित होतात आणि ते शरीराच्या अंतर्गत घड्याळाच्या नियंत्रणात असतात. अभ्यासकांनी अनेक रिसर्च संग्रहित करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, शरीराची अंतर्गत घड्याळाच्या रिदम आणि रोगप्रतिकारक क्षमतेच्या प्रतिक्रियेत काय आणि कसे संबंध असतात. यासाठी अभ्यासकांनी वेगवेगळ्या रिसर्चचा अभ्यास करून त्यांची तुलना केली. शरीरातील रोगप्रतिकारक सेल नॉर्मल परिस्थितीमध्ये, सूज आणि वेदनेच्या स्थितीत, आजारी होण्याच्या स्थितीमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला कसे प्रतिक्रिया देतात, हे तपासण्यात आले. बदलेली जीवनशैली, एकाच जागी बसून काम करणे, जंक फूड, फास्ट फूड, अपुरी झोप, मद्यसेवन आणि धुम्रपान यामुळे कमी वयातही हार्ट अटॅक येत आहे. यातील काहींना तर उपचार घेण्याचीही संधी मिळत नाही आणि ते जीव गमावून बसतात. कमी वयात हार्ट अटॅकचे कारण जेनेटिक असते, आणि आताची खराब लाइफस्टाइल हा आजार आणखी वाढवतात. धुम्रपान हे हृदयासाठी किती घातक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. धुम्रपान आणि मद्य यामुळे कोलेस्टड्ढॉलचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यामुळे हार्ट अटॅक येतो.

तणाव हा हृदयासाठी फारच घातक असतो. डिप्रेशनमुळे हृदयाचा आजार गंभीर रूप धारण करतो. राग, चिडचिड यामुळे रक्तदाब वाढतो. डिप्रेशनने ग्रस्त लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता ४ पटीने जास्त असते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात ५०० ते ९५० कॅलरीज बर्न करण्यासाठी योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल महत्वाची असते. जर तुम्ही शरीराची फार हालचालच करत नसाल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक वाढते. हृदयाशी संबंधित रोगांना दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वजन कमी ठेवायला हवे. जाडेपणा उच्च कोलेस्टड्ढॉल, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन रेजिस्टेंस यास कारणीभूत ठरतो. याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.