आरोग्यानामा ऑनलाईन टीम : तुम्ही लठ्ठ आहात अथवा नाही, हे कसे ओळखावे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. कारण प्रत्येकाची प्रकृती, अंगकाठी, वजन वेगवेगळे असते. त्यामुळे लठ्ठपणा केवळ वजनाच्या आकड्यावर ठरवता येत नाही. यासाठी एक सोपी आणि शास्त्रीय पद्धत असून त्यास बीएमआय असे म्हणतात. ही पद्धत वापरून कुणीही आपण लठ्ठ आहोत का, हे जाणून घेवू शकतो. लठ्ठपणा ओळखण्याच्या दोन पद्धती आणि त्यासंबंधीच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
ही आहे पहिली पद्धत
बीएमआय = वजन / उंचीचा वर्ग
उदाहरणार्थ ५ फूट ७ इंच (१.७ मीटर) उंचीच्या व ७५ किलो वजनाच्या माणसाचा बीएमआय = ७५ / (१.७) २ = २५.९
हे लक्षात ठेवा
१ आशियाई देशातील म्हणजेच भारतीयांमध्ये २१ हा योग्य बीएमआय आहे. यापेक्षा अधिक बीएमआय असल्यास ती व्यक्ती लठ्ठ आहे, असे समजावे.
२ भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते.
३ पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते.
४ पोटाजवळी चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते. यामुळे मानसिक व शारीरिक आजार जडतात.
ही आहे दुसरी पद्धत
* पोटाचा घेराववरून लठ्ठपणा समजू शकतो.
* स्त्रियांमध्ये पोटाचा घेर ३१ इंच (८० सेमी) अथवा त्यापेक्षा अधिक तर पुरुषांमध्ये ३५ इंच (९० सेमी) च्या वर असल्यास लठ्ठपणा आहे असे समजावे.
Visit : arogyanama.com