आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, दूध पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. परंतु दूध कधी प्यावं हे आपल्याला माहिती नसतं. दूध आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. दुधात प्रोटीन, व्हिटॅमिन A, B1, B2, B12 आणि D तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे. तसचे त्या विशिष्ट वेळी दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
सकाळी दूध प्यावं का ?
अनेकजण म्हणतात की, सकाळी दूध प्यायला हवं. सर्व पोषक घटकांनी युक्त असे दूध सकाळी चांगले आहे. परंतु तज्ञांच्या मते सकाळी दूध पिणें जास्त फायदेशीर नाही. जाणून घेऊयात सकाळी दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान ?
सकाळी दूध पिण्याचे फायदे
सकाळी सकाळी एका ग्लास दुधाने दिवसाची सुरुवात करणे चांगले आहे. नाश्त्यात वोटमिल आणि अंड्यासोबतच दुधाचे सेवन करणे एक चांगला आणि निरोगी पर्याय ठरू शकतो. असा नाश्ता पचायलाही हलका असोत. शिवाय दुधात पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
सकाळी दूध पिण्याचे नुकसान
काहींना सकाळचा हेल्दी नाश्ता आणि त्यासोबत पोषक घटकांनी भरपूर असे दूध पिल्याने पचण्यासाठी अडचण येऊ शकते. कारण हे एक हेवी भोजन ठरू शकतं. यामुळे पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो. याशिवाय सकाळी दूध पिणं स्किनसाठी चांगलं नाही. त्यामुळे सकाळी दूध पिणं टाळलेलंही चांगलं ठरू शकतं.
रात्री दूध प्यावं का ?
रात्री दूध पिणं लाभदायक ठरतं. कारण रात्री आपणं थकलेलो असतो. त्यामुळे आराम करताना आणि शरीराची झीज भरून काढायला मदत मिळते. सकाळी दूध पिण्यापेक्षा रात्री दूध पिणं जास्त फायदेशीर ठरंतं.
रात्री दूध पिण्याचे फायदे
दूधात दोन न्यूरोट्रांसमीटर असतात. त्यांचा आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभ होतो. रात्री दूध पिणं झोपेसाठी जास्त फायदेशीर ठरतं. रात्री दूध पिऊन झोपल्याने तुम्हाला तृप्त वाटतं. रात्री अचानक भूक लागण्यापासूनही तुमची सुटका होते. आपल्या स्नायूंना आराम तर मिळतोच शिवाय तणावासोबत लढण्याचे कामही दूध करते. रात्री दुधाचे सेवन केल्याने त्वचा तरुण दिसते.
रात्री दूध पिण्याचे नुकसान
रात्री दूध पिणार असाल तर उपाशी पोटी पिऊ नका. यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. लॅक्टोजच्या अॅलर्जीमुळे काहींना पोटदुखीची समस्याही होऊ शकते. रात्री दूध पिल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते.