आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दूध हे पौष्टिक असल्याने ते सर्वच वयोगटातील लोकांसाठी खुप लाभदायक असते. यातून शरीराला मोठ्याप्रमाणात कॅल्शिअम मिळते. हाडांच्या समस्येपासून सुटका होते. परंतु, दूध कोणत्या वेळेत पिणे जास्त फायद्याचे असते, हे अनेकांना माहित नसते. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती ते जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१ सकाळी आंघोळ केल्यावर आणि सायंकाळी दूध पिणे चांगले. मुले खेळून येतात तेव्हा त्यांना एक ग्लास दूध द्यावे.
२ खोकला, सर्दी किंवा कफ असलेल्या लोकांनी दूध घेऊ नये. खासकरून रात्री दूध पिऊ नये.
३ भूक लागल्यावर जेवण करतात तसेच भूक लागल्यावर दूध प्यावे.
४ दूध पचायला जड वाटत असेल तर त्यांनी थोडी सूंठ घालून प्यावे.
५ रात्री जेवणानंतर काही तासांनी एक ग्लास दूघ पिऊ शकता.
६ सकाळी आंघोळपूर्वी मुलांना दूध देऊ नका. यामुळे दूध सहजपणे पचत नाही. आंघोळ झाल्यावर दूध द्या.
७ रात्री केवळ गरमीच्या दिवसातच दूध प्यावे.
८ रात्री लहान मुलांना दूध देऊ नये, कारण ते पचन्यासाठी जड होते.
९ दूधासोबत कोणत्याही आंबट फळांचे सेवन करू नका. गॅसची समस्या होऊ शकते.
Visit : arogyanama.com