आरोग्यानामा ऑनलाइन टीम – चुकीच्या सवयी सोडल्यास आणि योग्य आहार, व्यायाम केल्यास लठ्ठपणा टाळता येतो. लठ्ठपणामुळे वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये सद्य:स्थितीत अतिशय गंभीर आजार म्हणजे फॅटी लिव्हर होय. अल्कोहोलवर नियंत्रण, कमी कर्बोदके असलेल्या पदार्थांचे सेवन व संतुलित आहाराचा समावेश केल्यास फॅटी लिव्हरची समस्या कमी करता येते.
ही आहेत लक्षणे
१ थकवा जाणवणे
२ पोटदुखीचा त्रास होणे
३ वजन कमी होणे
४ भूक कमी लागणे
हे आहेत दोन प्रकार
१ अल्कोहोल फॅटी लिव्हर
रोजच्या आहारात ज्यांचे अल्कोहोलचे प्रमाण जास्त आढळते तसेच अल्कोहोलमध्ये शर्करा आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असले, तर फॅटी लिव्हरची शक्यता असते. त्यामुळे अल्कोहोलिक लोकांना हा धोका जाणवणार आहे.
२ नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर
आहारात खूप जास्त कर्बोदके तसेच साखर तसेच खूप प्रमाणात फळे यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होतो. वजन कमी करण्याच्या नादात किंवा खूप जास्त फॅटलॉस करण्याच्या नादात खूप लोक अतिक्रश डाएट करतात. त्यामुळे जेवणाऐवजी जास्त प्रमाणात केलेल्या फ्रूट डाएटमुळे व फळातील फ्रूक्टोझमुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते.
हे लक्षात ठेवा
* कावीळसारखे आजार होऊन खूप जास्त प्रमाणात लिव्हरला सूज होऊ शकते.
* योग्य वेळेत शारीरिक परीक्षण, रक्ततपासणी, अल्ट्रासाउंड टेस्टद्वारे इमेजिंग परीक्षण, लिव्हर बायोप्सीद्वारे तपासणी करून घ्यावी.
* हा आजार पूर्णपणे बरा होत नाही; पण तीव्रता कमी होऊ शकते.
* याची लक्षणे आढळली तर थेट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* योग्य उपचार न झाल्यास लिव्हरला इजा होऊन सॉरेसेस होऊ शकतो.