आरोग्यनामा ऑनलाईन टीम : चांगल्या आरोग्याचे गुपित हे आहारात दडलेले आहे. चांगला आहार घेतला तरच आरोग्य उत्तम राहू शकते. यासाठी व्हिटॅमिन आणि मिनरल्सची शरीराला किती आवश्यकता असते, याची माहिती करून घेणे आवश्यक असते. व्हिटॅमिन सी ची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात.
या समस्यांची शक्यता
१ त्वचेचे आरोग्य बिघडते.
२ हाडे कमकुवत होतात.
३ सांधेदुखी वाढू शकते.
४ लिगामेण्ट्स कमकुवत होतात.
५ दात कमकुवत होतात.
हे लक्षात ठेवा
१ हिवाळा आणि उन्हाळ्यात व्हिटॅमिन सीची शरीराला जास्त गरज असते.
२ लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करावा.
३ याचा अभाव असल्यास काही विशिष्ट प्रकारचे जिवाणू त्रासदायक ठरतात.
४ रोज योग्यप्रमाणात पाणी प्यावे.
५ त्वचा, हाडे, सांधे, लिगामेण्ट्स, दात आदीसाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग होतो.
Visit : arogyanama.com