आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तणाव, डिप्रेशन, टेन्शन आदी शब्दांचा वापर अनेकदा केला जातो. डिप्रेशन, तणाव, टेन्शन हे सर्व एकच असल्याचे काही लोकांना वाटते. परंतु, यामध्ये अंतर आहे. तणाव आणि डिप्रेशन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांचा जीवनावर आणि मनावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. काही वेळा डिप्रेशन आणि तणावाची लक्षणे एकसारखी असल्याने फरक समजून घेणे कठिण होते. तणाव आणि डिप्रेशनमधील फरक आपण जाणून घेणार आहोत.
हा आहे फरक
1 तणाव एका घटनेमुळे किंवा एका स्थितीमुळे सुरु होतो.
2 डिप्रेशन एक मानसिक विकार आहे जो मेंदुच्या काम करण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करतो.
3 डिप्रेशन अनुवांशिक समस्याही असू शकते.
4 जीवनशैलीत बदल करुन आणि डिप्रेशनचा सामना करुन यातून सुटका मिळवली जाऊ शकते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज पडू शकते.
5 डिप्रेशन ग्रस्त व्यक्ती वेळीच डॉक्टरांकडे गेला तर त्याची समस्या वेळीच दूर होऊ शकते.
6 तणावाची स्थिती निघून गेल्यावर व्यक्ती सामान्यपणे जीवन जगू शकतो.
7 प्रेशनच्या स्थितीमध्ये एकटेपणा, उदासी, निरुत्साही होण्याची शक्यता आयुष्यभर राहू शकते.
8 डिप्रेशननंतर मानसिक आणि शारीरिक बदल होतात जे फार गंभीर आणि जास्त कालावधीसाठी त्रासदायक ठरू शकतात.
9 झोपण्याची वेळ बदलणे, थकवा, मूड स्विंग, पश्चाताप, निराशा आणि जीवन न जगण्याची इच्छा ही डिप्रेशनची लक्षणे आहेत. हे मेंदुतील बदललेल्या केमिकल्समुळे होते. जे स्वत:हून ठिक होत नाही.