सुवर्णप्राशन म्हणजे काय ? काय आहेत याचे मोलाचे ‘फायदे’ ?
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – तुम्ही सुवर्णप्राशन शब्दाबद्दल ऐकलं आहे का ? नक्कीच नसेल ऐकले. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. सुवर्णप्राशन म्हणजे सोन्याचे भस्म आणि ब्राम्ही यांसारख्या प्रमुख घटकासह इतर औषधी वनस्पती द्रव्यांसोबत एकत्र करून मध आणि तूप यासमवेत एकजीव असे लेह (चाटण) स्वरुपाचे मिश्रण. या सुवर्णप्राशनचे अनेक फायदे आहेत. या फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
सुवर्णप्राशानचे फायदे कोणाला ?
नवजात बालकापासून ते १६ वर्षांच्या मुलापर्यंत सर्वाना आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो.
काय आहेत सुवर्णप्राशनाचे फायदे ?
सुवर्णप्राशनं हि ऐतत् मेधाग्निबलवर्धनम्।
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।।
काश्यप संहिता
1) मेंदूचा विकास
लहान मुलांचा मेंदूचा विकास त्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावर अवलंबून असतो. जर त्यांच्या आहारत सुवर्णप्राशनाचा समावेश केला गेला तर त्यांच्या मेंदूचा विकास होण्यास जास्त फायदा होतो.
2) आकलन क्षमता
आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की, लहान मुलांमध्ये चंचलतेचे प्रमाण खूप असते. सुवर्णप्राशनच्या मदतीने मुलांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी मदत होते.
3) पचनसंस्था/आजार
आजकालच्या जंक फूडच्या वाढत्या सेवनाने मुलांमध्ये लहान वयात लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय पचनसंस्थेवर परिमाण होऊन अनेक आजारही होतात. सुवर्णप्राशनची यापासून बचाव करण्यासाठी विशेष मदत होते.
4) रोगप्रतिकारक क्षमता
लहान मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडत असतात. याचे कारण म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता. ऋतू बदलताना वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाणही खूप आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सुवर्णप्राशनाचा खूप उपयोग होतो. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्यामुळे बदललेल्या वातावरणाशी मुले सहज जुळवून घेऊ शकतात.
5) घातक गोष्टींपासून बचाव
आताच्या काळात शेतामध्ये जो भाजीपाला पिकवला जातो तो पूर्णतः सेंद्रिय खते वापरून पिकवला जात नाही त्यामुळे त्यास वापरल्या गेलेल्या रासायनिक खतांचा अंश त्यात असतो. असा भाजीपाला धुऊन, शिजवून जरी खाल्ला तरी काही प्रमाणात रासायनिक घटक शरीरात जात असतात, त्यापासून बचाव होण्यास सुवर्णप्राशन मोलाची मदत करते.
6) वर्ण सुधारतो
येथे वर्ण म्हणजे रंग असा अर्थ नाही. त्वचेवरील तजेलदारपणा असा याचा अर्थ आहे. सुर्वणप्राशनाने त्वचा तजेलदार होण्यास विशेष मदत होते.
अशा प्रकारे सुवर्ण प्राशन हे एकूणच शरीराची वाढ, मेंदूची वाढ, ऋतू बदलात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देते आणि शरीराचे बल वाढवण्याचे काम करते.
सुवर्णप्राशन कधी द्यावे ?
सुवर्णप्राशन प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला दिले जाते, त्यासोबत दररोज सकाळीही दिले जाऊ शकते.
श्री विश्वांगद आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर
ISO 9001:2015
101
महालक्ष्मी विहार बनारस डेअरी जवळ कड नगर उंड्री पुणे 60
पुष्य नक्षत्र दिनांक 01/08/2019
सर्व बालकांना याचा लाभ मिळावा यासाठी आपण आपल्या जवळील वैद्याकडे जाऊन आपल्या बालकास सुवर्ण प्राशन द्यावे
नोंदणी आवश्यक
मोबाइल नंबर : 9907090775 / 9970390547
Comments are closed.