आरोग्यनामा ऑनलाईन – सतत झोप येणे, नियंत्रण ठेवणे अशक्य होणे, हे नार्कोलेप्सी या आजाराचे लक्षण असू शकते. यास एक न्यूरोलॉजिकल समस्या मानले जाते. ही समस्या वेळीच ओळखून डॉक्टरांकडे गेल्यास उपचारानंतर सुटका होऊ शकते. परंतु, याची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे. नार्कोलेप्सीचे लक्षणे आणि उपायांबाबत जाणून घेवूयात.
ही आहेत लक्षणे
1 कधीही आणि केव्हाही झोप येते.
2 सकाळी उठण्यास फार उशीर होतो.
3 स्लीप पॅरालिसिसची समस्याही होऊ शकते.
4 सारखी झोप येते.
5 आठ ते नऊ तासाच्या झोपेनंतरही झोप न झाल्यासारखे वाटते.
6 सतत आळस आणि थकवा येतो.
हे आहेत उपाय
1 डॉक्टरांचा सल्ला घ्या
2 झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा निश्चित करा
3 रिकाम्या वेळी एखादी डुलकी घ्या