मदर मिल्क बॅकेचे कार्य
येथे नवजात बालकांसाठी आईचे दूध सुरक्षित स्टोअर केले जाते. ज्या बालकांची आई काही कारणामुळे बाळाला दूध पाजू शकत नाही, अशा बालकांना येथे साठवण्यात आलेले दूध पाजण्यात येते. ही एक नॉन-प्रॉफिट बॅंक आहे.
दूध दान
या केंद्रामध्ये स्वेच्छेने आणि मुलांना दूध पाजू न शकणाऱ्या महिला दूध दान करू शकतात. ज्या मातेचे बाळ दूध पित नाही, अशा मातेला दूध न काढल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा मातांसाठी दूध दान करणे हा उत्तम पर्याय असतो. या प्रकारचे उपक्रम जगभरात ब्राझील, यूरोप, लेटिन अमेरिका स्पेन, पुर्तगाल, नॉर्थ अमेरिका, भारत आणि दक्षिण अफ्रीका या देशांमध्ये सुरू आहेत.
*दूध दान करण्यासाठी आलेल्या मातेची प्रथम एचआईवी, एचबीएसएजी, डब्लूबीआरएलची टेस्ट करण्यात येते. रिपोर्टनंतर महिलेची लेखी परवानगी घेण्यात येते.
* दान केलेल्या दुधाला पाश्चराइज करण्यासाठी उणे ५ डिग्री तापमानात ठेवण्यात येते. दूध ब्रेस्ट पंपने काढण्यात येते. दूध काढताना मातेला मुलाला दूध पाजत असल्याचा अनुभव मिळतो.
* दूध काढल्यानंतर ते कल्चर टेस्टसाठी पाठवण्यात येते.
* दूधाचा रिपोर्ट योग्य आल्यानंतर ३०-३० मिलीलीटरचे यूनिट बनवून ते उणे २० डिग्री तापमानात ठेवण्यात येते.
मातेच्या दुधाला पर्याय नाहीच
नवजात बालकांसाठी बाजारात उपलब्ध डब्बाबंद दूधाला फॉर्मूला मिल्क म्हटले जाते. परंतु, त्यामध्ये रोग प्रतिरोधक क्षमता, हार्मोन, एंजाइम्स आणि जिंवत सेल उपलब्ध नसतात. आईच्या दूधामध्ये मानवाचा विकास करणारे घटक असतात आणि फॉर्मूला हे गायीचे दूध असते.