आरोग्यनाम ऑनलाइन टीम –
हायपरटेन्शन आजाराबाबात योग्य माहिती असेल तर वेळीच त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते. विशेष म्हणजे अनेकांना या आजाराबाबत काहीच माहिती नसते. यास हाय बीपी असेही म्हटले जाते. बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या ही समस्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. लाखो लोक यामुळे जीव गमावतात. या आजाराची लक्षणे माहित असल्यास लवकर निदान होऊ शकते.
हायपरटेन्शन
शरीरातील सर्वच अंगाना रक्त पोहोचवण्याचे कार्य हृदय करत असते. या रक्तप्रवाहाने हृदय एक प्रकारचा दाब तयार करते. या दबावालाच रक्तदाब म्हणतात. या दाबामुळे शरीरातील रक्तप्रवाहाला वेग येतो. या वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे हृदयाला अधिक काम करावे लागते. सामान्य ब्लड प्रेशर १२०/८० एमएमएचजी असते. ब्लड प्रेशर १४०/९० एमएमएचजीपेक्षा जास्त झाल्यास हायपरटेन्शनचा आजार असू शकतो.
ही आहेत कारणे –
३) मीठाचे अधिक सेवन
४) व्यायामाचा अभाव
१) स्मोकिंग, तंबाखू आणि अल्कोहोल
२) मानसिक तणाव
हे आहेत गंभीर परिणाम –
१ हृदयाचे नुकसान होते.
२ डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या नसांनाही धोका होऊ शकतो.
३ दृष्टी कमजोर होऊ शकते.
४ किडनीवरही परिणाम होतो.
ही आहेत लक्षणे –
१ छातीत दुखणे
२ छातीत भरुन येणे
३ श्वास घ्यायला त्रास होणे
४ खूप जास्त थकवा जाणवणे
५ मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे
६ सतत खोकला येणे
७ भूक कमी लागणे
अशी घ्या काळजी –
१ शरीराची हालचाल वाढवा
२ मद्याचे सेवन कमी करा.
३ स्मोकिंग करु नका.
४ आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
५ हिरव्या भाज्या अधिक खायला हव्यात.
६ बाहेरचे पदार्थ खाणे टाळा
७ नियमीत व्यायाम करा