आरोग्यनामा ऑनलाईन – जपानमध्ये फॉरेस्ट थेरपी खुप प्रसिद्ध आहे. जपानी भाषेत शिन्रीन-योकू म्हटले जाते. या थेरपीचा हेतू सरळ आणि पद्धत खुप सोपी आहे. जंगलाच्या वातावरणात वेळ घालवणे म्हणजे फॉरेस्ट थेरपी होय. जंगलामध्ये सर्वांनाच आनंद मिळतो, पण यामुळे आरोग्यही चांगले राहते. मेंदु आणि शरीरासाठी ही थेरपी फायदेशिर आहे. जे चिंता आणि तणावाने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी फॉरेस्ट थेरपी वरदान ठरू शकते.
हे आहेत फायदे
1 जंगलातील शांततेमुळे आणि वेगवेगळ्या ध्वनींमुळे व्यक्तीला आराम जाणवतो.
2 कोर्टिसोल या तणाव निर्माण करणारे होर्मोन कमी होतात.
3 रक्तप्रवाह आणि एटीपोनेक्टिनवर सकारात्मक प्रभाव होतो.
4 ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. रक्तप्रवाह सामान्य होतो.
5 येथ आंघोळ करण्याचा सकारात्मक भावनांमध्ये वाढ होते आणि नकारात्मक भावना कमी होतात. मन शांत आणि मोकळे होते. चिंता, डिप्रेशन आणि तणाव कमी होतो.
6 ग्लूकोजचे प्रमाण कमी होते. मधुमेह असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.
7 कॅलरी बर्न करण्यास मदत होते. वजन कमी होते.