आरोग्यानामा ऑनलाईन टीम : क्रायोथेरपीची क्रेझ सध्या वाढते आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी अशा विविध थेरपी करण्याचे फॅड सध्या वाढत आहे. यामध्ये बॉलीवुडचे स्टार्स आघाडीवर असतात. यातील काही थेरपी नॅचरल तर काही केमिकल्स बेस्ड असतात. क्रायोथेरपीचे शरीराला होणारे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
अशी करतात क्रायोथेरपी
व्यक्तीला विवस्त्र अवस्थेत एका खोलीमध्ये बसविण्यात येते. या खोलीत 100 डिग्रीच्या थंड वाफा जवळपास 4 ते 5 मिनिटांपर्यंत सोडल्या जातात. या थंड वाफा शरीरावर पडल्या की शरीर विषारी पदार्थांना प्यूरिफाय करू लागते. 4 ते 5 मिनिटे थंड वाफा सोडल्यानंतर पुन्हा तापमान गरम होऊ लागते. त्यावेळी पुन्हा थंड वाफा सोडण्यात येतात.
हे आहेत फायदे
1 मायग्रेनमुळे होणारा त्रास कमी होतो.
2 थकवा आणि सूज कमी करता येते.
3 त्वचेसंबंधीच्या समस्यांपासून सुटका होते.
4 जमा झालेले फॅट आणि सेल्युलाइट कमी होते.
कधी करू नये
* स्किन इन्फेक्शन असेल तर
* हाय ब्लड प्रेशर असेल तर
* थेरपीदरम्यान जास्त थंडी वाजली तर थेरपी घेणं थांबवा
* दुखापत झाल्यावर
* हृदयाशी निगडीत आजार असल्यावर
Visit : arogyanama.com